घरदेश-विदेशशेतकऱ्याच्या मुलाला १५ व्या वर्षी जेईई परिक्षेत यश

शेतकऱ्याच्या मुलाला १५ व्या वर्षी जेईई परिक्षेत यश

Subscribe

देशभरात ‘जेईई अॅडव्हान्स’ परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत बिहार विभागातील १५ वर्षीय मुलाला यश मिळाले आहे. यंदाच्या परिक्षेत यश प्राप्त करणारा हा सर्वात लहान विद्यार्थी ठरला असल्याचे सांगितले जात आहे. शिवम कुमार असे या मुलाचे नाव असून तो बिहार येथील बखोरापूर गावात रहातो. ३६० पैकी २४१ गुण मिळवून त्याने देशात ३८३ क्रमांक पटकावला. २० मे रोजी आयआयटी कानपूरच्यावतीने देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून यावर्षी जवळपास एक लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

शेतकऱ्याच्या मुलाने गावात कमावले नाव
शिवम कुमार हा एका छोट्या गावात रहात असून त्याचे वडिल शेतकरी आहेत. फक्त १५ व्या वर्षात जेईईची परिक्षा पास झाल्यामुळे शिवमचे कौतुक होत आहे. गावातील इतर मुलांनीही त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे मत ग्रामस्थ व्यक्त करण्यात येत आहे. शिवमने बारावीला ९२ टक्के गुण मिळवले होते. गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने शिवमला वयाच्या पाचव्या वर्षी घर सोडावे लागले आणि तो कोटा येथे काकाच्या घरी रहायला लागला. शिवमचा लहान भाऊ ‘सत्यम’ याने २०१२ ला वयाच्या १३व्या वर्षी ‘जेईई अॅडव्हान्स’ परिक्षेत यश मिळवले होते.

- Advertisement -

जेईई परिक्षेत यश मिळवून मला खूप आनंद होत आहे. माझ्या क्लासमधील सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी पास होऊ शकलो. नियमीत अभ्यास, नोट्स, उजळणी आणि प्रश्नांचा सराव यामुळे मला हे यश मिळू शकले. – शिवम कुमार, विद्यार्थी

कमी वयात जेईई परिक्षेत दोन्हीही मुलांना यश मिळाल्यामुळे मला खुप आनंद होत आहे. मला माझ्या दोन्ही मुलांवर अभिमान आहे – सिद्धार्थनाथ, शिवमचे वडिल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -