Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: भारतात लसीकरण मोहिमेला १५० दिवस पूर्ण; लसीकरणासाठी २६ कोटींहून अधिक...

Corona Vaccination: भारतात लसीकरण मोहिमेला १५० दिवस पूर्ण; लसीकरणासाठी २६ कोटींहून अधिक डोसचा वापर

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना रोखण्यासाठी सध्या लसीकरण मोहीमेवर अधिक भर दिला जात आहे. १४ जूनला कोरोना लसीकरण मोहीमेला १५० दिवस पूर्ण झाले असून या दिवशी २५.९० कोटी लोकांना लस दिली होती. प्रत्येक दिवसाला १७.२६ कोटी लसीचे डोस दिले जात आहे. याप्रमाणे संपूर्ण प्रौढ व्यक्तीचे अंशतः लसीकरण होण्यासाठी सुमारे ७८ आठवडे किंवा १८ महिने लागतील. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात २६ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे.

यावर्षी १६ जानेवारीपासून केंद्र सरकारने आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आलेल्या दोन लसीचे डोस देण्यास सुरुवात केली. याअंतर्गत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले जात आहे. एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूटने पार्टनरशिपमध्ये कोविशिल्ड विकसित केली असून हैदराबाद स्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन विकसित केली आहे.

- Advertisement -

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे. त्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय. मग १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू केला आणि यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १ कोटींहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि १ कोटी ६९ लाखांहून अधिक फ्रंटलाीन वर्कर्सना कोरोना लसीच पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच ६९ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी, ८९ लाखांहून अधिक फ्रंटलाईन वर्कर्सना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर ६०हून अधिक वर्षांच्या ६ कोटी ३२ लाखांहून अधिक जणांचा पहिला डोस आणि २ कोटी २ लाखांहून अधिक जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ ते ५९ वयोगटातील ७ कोटी ७२ लाखांहून अधिक लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus होतोय दिवसेंदिवस चलाख, म्युटेशनला रोखण्यासाठी नाही अस्त्र – डॉ. पॉल


 

- Advertisement -