घरताज्या घडामोडीकाबुल एअरपोर्टवर अपहरण नाट्य, १५० भारतीयांची पासपोर्ट पडताळणीनंतर सुटका

काबुल एअरपोर्टवर अपहरण नाट्य, १५० भारतीयांची पासपोर्ट पडताळणीनंतर सुटका

Subscribe

तालिबानी दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानातील काबुल एअरपोर्टवर १५० भारतीयांचे अपहरण केल्याचे वृत्त सुरूवातीला एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. मात्र नव्या माहितीनुसार या १५० भारतीयांची सुटका तालिबानने केली आहे. आता हे सर्व भारतीय पुन्हा काबुल एअरपोर्टच्या दिशेने गेल्याची सूत्रांची माहिती आहे. काबुल नाऊ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५० नागरिकांचे अपहरण झाल्याचे वृत्त होते. त्यामध्ये बहुतांश नागरिक हे भारतीय असल्याची माहिती समोर आली होती. त्यामध्ये भारतीय नागरिकांमध्ये अफगाणिस्तानातील शीख समुदायाच्या भारतीयांचाही समावेश होता.

शनिवारी मध्यरात्री हे भारतीय नागरिक आठ वेगवेगळ्या वाहनातून काबुल एअरपोर्टवर जात होते. पण या नागरिकांना काबुल एअरपोर्टवर जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. कोणतेही सहकार्य न मिळाल्यानेच नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला गेला. त्यानंतर तालिबान्यांकडून ताराखील याठिकाणी या शहरात १५० जणांना नेण्यात आले. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार या नागरिकांना अल्कोझाय ग्रुप ऑफ कंपनीजकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी नागरिकांचे पासपोर्ट गोळा करण्यात आले आहेत. या नागरिकांची चौकशी पुर्ण झाल्यानंतरच यांना पुन्हा एकदा सोडून देण्यात येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार या नागरिकांची चौकशी पुर्ण झाल्यानेच या नागरिकांना सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावर १५० हून अधिक नागरिकांचे अपहरण झाल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या अपहरण झालेल्यांमध्ये बहुतांश अशा भारतीय नागरिकांचा समावेश आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी या १५० जणांना एका ठिकाणी नेल्याची माहिती आहे. पण हे अपहरण का झाले याची माहिती मात्र समोर आलेली नाही. याआदी तालिबान प्रवक्त्यांनी याआधी अनेकदा प्रतिक्रिया दिल्या होत्या की परदेशी नागरिकांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. तसेच परदेशी नागरिकांना भारतातून बाहेर पडण्यासाठी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे तालिबानी संघटनेकडून वारंवार सांगण्यात आले होते. पण आजच्या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे. तालिबान संघटनेकडून १५० भारतीयांना विमानतळाच्या आत नेल्याचीह खुलासा केला आहे. या १५० भारतीयांचे अपहरण केले नसल्याची स्पष्टोक्ती तालिबानी संघटनेकडून देणय्ता आली आहे.

- Advertisement -

भारताने आपला दुतावाज काबुलमध्ये सुरू ठेवावा असे तालिबानी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले होते. सध्या एक हजारांहून अधिक भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत. भारतासोबतचे संबंध आम्ही सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. भारताच्या दुतावासालाही आम्ही संरक्षण देऊ असे स्पष्टीकरण तालिबानी संघटनांकडून करण्यात आले आहे. नॅटो देशांची एक महत्वाची बैठक होत आहे. अशावेळी नॅटो देशाकडून महत्वाची निर्णय घेण्याची शक्यता या बैठकीच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे. NATO ने याआधीच तालिबान्यांना परदेशी नागरिकांना देशाबाहेर पडुद्या अशी मागणी केली आहे. तालिबानी पूर्वीसारखच राहत असेल, पूर्वीसारखच राहत असेल तर आर्थिक बंदी आणता येईल का ? याचाही निर्णय या बैठकीच्या निमित्ताने अपेक्षित आहे.

भारतीयांचे अपहरण नाहीच, तालिबान संघटनेचे स्पष्टीकरण

काबुल एअऱपोर्टला १५० भारतीयांना सुरक्षितरीत्या एअऱपोर्टमध्ये नेले असल्याचे स्पष्टीकरण तालिबानने दिले आहे. अमाहदुल्लाह वसेक या तालिबानी प्रवक्त्याने भारतीयांचे अपहरण केले नसल्याचा दावा केला आहे. काबुलमध्ये १५० भारतीयांचे अपहरण केल्याचा दावाही त्यांनी फेटाळला आहे.


हे ही वाचा – खंडणीप्रकरण: परमबीर सिंह, सचिन वाझेंसहित तिघांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -