घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: सौदी अरबच्या १५० राजपुत्रांना कोरोनाची लागण!

CoronaVirus: सौदी अरबच्या १५० राजपुत्रांना कोरोनाची लागण!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यानच अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार एक मोठा खुलासा झाला आहे. सौदी अरबच्या रॉयल फॅमिलीतील १५० सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या प्रकरण्याच्या सहा आठवड्यानंतर रॉयल फॅमिलीत कोरोनाची लागण झाल्याचं न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार समोर आलं आहे.

सौदीत कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. या रॉयल फॅमिलीसाठी संभ्रांत रुग्णालयात ५०० बेड्सचं खास तयार ठेवण्यात आले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, सौदी अरबचे प्रांस मोहम्मद बिन सलमान, प्रिन्स फैसल बिन बंदर, बिन अब्दुल अजीज अल सऊद यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत सौदी अरबमध्ये ३ हजारहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या आठवड्यात सौदीची राजधानी रियाध आणि मक्कासह इतर अनेक शहरांध्ये २४ तास कर्फ्यू लावण्यास सुरुवात झाली. यापूर्वी रियाध, मक्का आणि मदिना या ठिकाणी प्रवास करण्यास बंदी घातली होती. याशिवाय मशिदीमधील नमाज पठण करण्यावर देखील बंदी घातली आहे. मंगळवारी विनाअनुदानित खासगी कर्जासंबंधित शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना तात्पुरते सोडण्याचे आदेश राजा सलमान यांनी दिले.

आतापर्यंत जगभरात १५ लाख ४० हजार ७१७ कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. त्यापैकी ९० हजार ८७६ जणांचा बळी गेला आहे. तसंच ३९ हजार २१४ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दिलास देणारी बाब म्हणजे ३ लाख ५५ हजार २७५ कोरोनाचे रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: कोरोनापासून वाचण्यासाठी नवजात बालकांना फेस मास्क


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -