घरदेश-विदेशभारतात १६० किमी प्रतितास वेगाने धावणार खासगी प्रवासी ट्रेन!

भारतात १६० किमी प्रतितास वेगाने धावणार खासगी प्रवासी ट्रेन!

Subscribe

देशात आत्तापर्यंत रेल्वेसेवा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडूनच पुरवली जात होती. आता मात्र या क्षेत्रात देखील खासगी कंपन्यांचा शिरकाव होणार असून देशात एकूण १५१ खासगी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या रेल्वे गाड्या तब्बल १६० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावणार आहेत. रेल्वे विभागाच्या अंदाजानुसार १३० किलोमीटर प्रतीतास वेगाने गाड्या धावल्या, तर प्रवासाच्या एकूण वेळेत १० ते १५ टक्के बचत होणार आहे. तर गाड्या १६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावल्या, तर प्रवास वेळेत ३० टक्के बचत होणार आहे. खासगी रेल्वेगाड्या चालवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असून पुढील वर्षी मार्चपर्यंत निविदांना अंतिम स्वरूप दिलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. २०२७पर्यंत देशात पूर्ण १५१ खासगी रेल्वेगाड्या कार्यरत होतील.

खासगी रेल्वेगाड्यांचा पहिला १२ गाड्यांचा टप्पा २०२२-२३ पर्यंत सुरू होईल. त्यापुढे २०२३-२४मध्ये ४५, २०२५-२६मध्ये ५० तर त्यापुढच्या २०२६-२७मध्ये ४४ रेल्वे गाड्या सुरू होतील. रेल्वे विभागाच्या अंदाजानुसार या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून सरकारला वर्षाला ३ हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. या गाड्या खासगी जरी असल्या, तर त्यामध्ये चालक आणि गार्ड भारतीय रेल्वेचेच असतील, असं देखील सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -