घर ताज्या घडामोडी मानवी शरीरात १६ इंच लांबीचा मासा; शस्त्रक्रिया करून काढला

मानवी शरीरात १६ इंच लांबीचा मासा; शस्त्रक्रिया करून काढला

Subscribe

व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, तो चुकून माशाच्या माथ्यावर बसला, त्यामुळे संपूर्ण मासा त्याच्या गुदाशयात गेला.

चीनमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करून एका व्यक्तीच्या गुदाशयातून मासे बाहेर काढले. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, तो चुकून माशाच्या माथ्यावर बसला, त्यामुळे संपूर्ण मासा त्याच्या गुदाशयात गेला. यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करून मासा बाहेर काढला.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात डॉक्टर रूग्णाच्या शरीरात अडकलेल्या निळ्या तिळपिया माशाला काढताना दिसत आहेत. चीनच्या स्थानिक माध्यमांमध्ये माशांच्या आकाराचा उल्लेख नसला, तरी छायाचित्रांनुसार त्याची लांबी १२ ते १६ इंच दरम्यान आहे.

- Advertisement -

दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील झाओकींग फर्स्ट पीपल्स हॉस्पिटलमध्ये ही घटना गेल्या मंगळवारी घडल्याचे समजते. वास्तविक माणसाच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा एक्स-रे स्कॅन केला, हे चित्र पाहिल्यानंतर स्वत: डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. त्या माणसाच्या गुदाशयात एक मृत मासा अडकला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यावेळी, त्या व्यक्तीने सांगितले की, तो चुकून माशावर बसला, त्यानंतर मासा त्याच्या गुदाशयात शिरला. सध्या ती व्यक्ती पूर्णपणे ठीक आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -