घरदेश-विदेशक्षयरुग्णांच्या संख्येत 16 टक्क्यांची घट, जगाच्या तुलनेत दुप्पट वेग

क्षयरुग्णांच्या संख्येत 16 टक्क्यांची घट, जगाच्या तुलनेत दुप्पट वेग

Subscribe

नवी दिल्ली : भारताच्या प्रयत्नांमुळे 2022मध्ये (2015पासून) क्षयरुग्णांच्या संख्येत 16 टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक क्षयरोगाचे प्रमाण कमी होण्याचा जो वेग (8.7 टक्के) आहे, त्या तुलनेत हा वेग जवळपास दुप्पट आहे. भारतात आणि जागतिक स्तरावर याच कालावधीत क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही 18 टक्क्यांनी कमी झाले आहे.

हेही वाचा – मुंब्रा येथील शिवसेना शाखेचा वाद चिघळण्याची चिन्हे, शनिवारी उद्धव ठाकरे देणार भेट

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 7 नोव्हेंबर 2023 रोजी ‘जागतिक क्षयरोग अहवाल 2023’ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, भारताने क्षयरुग्णांच्या उपचारांबाबत प्रचंड प्रगती केल्याचे समोर आले आहे. एकूण क्षयरुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्णांपर्यंत उपचार पोहचत असून मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात 19 टक्के वाढ झाली आहे. क्षयरोगप्रतिबंधक कार्यक्रमावर कोविड -19चा विपरित परिणाम भारताने होऊ दिला नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2021मध्ये क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 4.94 लाखांवरून 2022 मध्ये 3.31 लाखांवर आली आहे, यात 34 टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तांत्रिक गटादरम्यान या अहवालासंदर्भात 50हून अधिक बैठका झाल्या. या बैठकीत देशाच्या तांत्रिक गटाने शोधलेले सर्व नवीन पुरावे, नि-क्षय पोर्टलवरील डेटासह उपचारादरम्यान प्रत्येक क्षयरुग्णाचे बदल नोंदवणारी आकडेवारी सादर करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने सर्व डेटाचे सखोल आढावा घेतला आणि देशाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा देखील केली. भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांत घट होत असल्याचे यावर्षीच्या जागतिक क्षयरोग अहवालामध्ये म्हटले आहे. भारतातील क्षयरुग्ण शोधण्याच्या मोहिमेमुळे 2022 मध्ये 24.22 लाख इतकी आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली. ही संख्या कोविडपूर्व काळापेक्षाही अधिक आहे, अशी नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिवाळीत वातावरण बिघडवू नका! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्र्यांना समज

बाधित रुग्ण शोधण्याचे विशेष अभियान, निदानाचे प्रमाण गट स्तरापर्यंत वाढवणे, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राद्वारे स्क्रीनिंग सेवांचे विकेंद्रीकरण आणि खासगी क्षेत्रातील सहभाग यासारख्या सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांमुळे रुग्ण नोंदणीतील ढिसाळपणा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून समाजातील सर्व स्तरातील 1 लाखाहून अधिक नि-क्षय मित्रांनी 11 लाखांहून अधिक क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2018 मध्ये प्रारंभ झाल्यापासून नि-क्षय पोषण योजनेअंतर्गत 95 लाख क्षयरुग्णांना सुमारे 2613 कोटी रुपये मदत रुपाने वितरित केले गेले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी अतिरिक्त संसाधनांची गुंतवणूक करून या प्रयत्नांना प्राधान्य देण्यासाठी भारताने धाडसी पावले उचलली आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -