घरदेश-विदेशCovid-19 Vaccine घेतलेल्यांमध्ये साधारण १६ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग- अभ्यासातील निष्कर्ष

Covid-19 Vaccine घेतलेल्यांमध्ये साधारण १६ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग- अभ्यासातील निष्कर्ष

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधितांच्या आकड्यांचा आलेख उंचावत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची भासणारी कमतरता यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. दरम्यान Covid-19 Vaccine घेतलेल्या व्यक्तींमध्ये साधारण १६ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे एका अभ्यासातील निष्कर्षातून समोर आले आहे. नुकताच दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील ११३ आरोग्य कर्मचार्‍यांवर एक अभ्यास करण्यात आला. ज्यांनी कोरोनाच्या लसीचा कमीतकमी एक डोस घेतला आहे. असे सांगितले जात आहे की यापैकी करण्यात आलेल्या व्यक्तींच्या तपासणीत १८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

हा अभ्यास ‘मधुमेह आणि मेटाबोलिक सिंड्रोम: क्लिनिकल रिसर्च अँड रिव्ह्यूज’ या जर्नलमध्ये ३ मे रोजी प्रकाशित करण्यात आला होता. दिल्लीतील ‘फोर्टिस सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबिटीज, मेटाबोलिक डिसीज एंड एंडोक्रिनोलॉजी’ मधील कर्मचार्‍यांवर हा अभ्यास करण्यात आला होता. फोर्टिस, नॅशनल डायबिटीज, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल फाउंडेशन आणि नवी दिल्लीस्थित डायबिटीज फाउंडेशन (इंडिया) च्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

- Advertisement -

या अभ्यासातील लोकांची टक्केवारीकडे पाहिलं तर असे दिसून आले की, ज्यांनी ही लस दिली त्या व्यक्तींपैकी १५.९ टक्के म्हणजेच १८ व्यक्तींना संसर्ग झाला तर ९५ टक्के लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली. दरम्यान, दिल्लीत गेल्या २४ तासांत २० हजार ९६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १९ हजार २०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दिल्लीत आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ लाख ५३ हजार ९०२ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १८ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला असून ११ लाख ४३ हजार ९८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९१ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा हा कहर पाहता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -