घरCORONA UPDATEदेशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद, तर रुग्णांमध्ये 25.8 टक्क्यांनी...

देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद, तर रुग्णांमध्ये 25.8 टक्क्यांनी वाढ

Subscribe

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोविडच्या केससमध्ये 25.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाची एकूण 44,190,697 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दुसरीकडे, सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची संख्या 128,261 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत देशात 19,539 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 43,535,610 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण 526,826 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 15,21,429 इतकं लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 2,07,03,71,204 लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,372 नवीन प्रकरणं

दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,372 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत, तर संसर्गामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत संसर्ग दर 17.85 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 19,70,899 प्रकरणं नोंदवण्यात आली आहे. तसेच 26,336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

ठाण्यात कोविड-19 चे 123 नवे रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

ठाण्यात कोरोना विषाणूचे 123 नवीन रुग्ण आढळून आल्याने येथील संसर्गग्रस्तांची संख्या 7,35,416 वर पोहोचली आहे. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 1,099 वर पोहोचली आहे. सोमवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 11,932 वर पोहोचली होती. जिल्ह्यात संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या ७,२३,०१५ वर पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठमोळे सण आता जवळ येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होऊ नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आरोग्य मंत्रालयाला पत्र देण्यात आलं आहे.


हेही वाचा : कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी दुसऱ्यांदा कोरोनाबाधित


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -