देशात २४ तासांत १६ हजार ६७८ नवीन कोरोनाबाधित, तर मृत्यूच्या संख्येत वाढ

Coronavirus

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात मागील २४ तासांत १६ हजार ६७८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, रविवारच्या तुलनेत आज कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत.

देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३० हजारांच्या पार गेली आहे. तर कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्यानेही ५ लाख २५ हजारांचा आकडा पार केला आहे. देशात १४ हजार ६२९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट ५.९९ टक्के इतका आहे.

कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाहीये. सध्या चौथ्या लाटेची टांगती तलवारही कायम आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर शासनाचा भर आहे. जर तुम्ही दुसरा डोस घेतला असेल, तर आता तुम्हाला बूस्टर डोससाठी ९ महिन्यांऐवजी ६महिने किंवा २६ आठवडे थांबावे लागणार आहे.

दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे ३९९ नवीन रुग्ण आढळले होते. काल मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी शहरात संसर्गामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही.


हेही वाचा : श्रीलंकेत राष्ट्रपतीभवन बनलं पिकनिक स्पॉट, आंदोलकांचा स्विमिंग पूलमध्ये धिंगाणा