Coronavirus: अमेरिकेत एका दिवसात १६ हजार करोनाचे रुग्ण; २४ तासांत २६८ जणांचा मृत्यू

करोनाग्रस्तांचा आकडा ८५ हजार ५९४ वर पोहोचला आहे.

coronavirus
CoronaVirus: देशभरात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या ५ हजाराच्या वर!

करोनाने अमेरिकेत थैमान घातले आहे. ज्या देशातून करोनाचा उगम झाला त्या चीनला अमेरिकेने मागे टाकले आहे. करोनामुळे आतापर्यंत जगात २४,०८६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत करोनाचे १७,२२४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेत करोनाचे ८५ हजार ५९४ रुग्ण झाले आहेत. अमेरिकेत एका आठवड्यापूर्वी केवळ ९००० रुग्ण होते. आज हा आकडा ८५ हजार ५९४ वर पोहोचला आहे.


हेही वाचा – Coronavirus: सिंगापूर, तैवान आणि हाँगकाँगमध्ये करोना नियंत्रणात कसा?


अमेरिकेत वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार २४ तासांत २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा १३०० वर पोहोचला आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये सर्वाधीक ३८ हजार ९७७ करोनाग्रस्त आहेत. तर ४६६ जणांचा मृत्यू झाला आहे.येत्या काही दिवसांत अमेरिकेत करोनाग्रस्तांची आणि मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये ८१,३४० करोनाचे रुग्ण आढळले होते. तर करोनाने आतापर्यंत ३२८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये ८०,५८९ करोनाचे रुग्ण आढळले होते. तर आतापर्यंत ८२१५ लोकांचा मृत्यू झाला आहे.