Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक १६,९२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

प्रातिनिधीक फोटो

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढत झाली आहे. मागील २४ तासांत देशात १६ हजार ९२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७३ हजार १०५ वर पोहोचली असून मृतांची संख्या १४ हजार ८९४ झाली आहे. तसेच २४ तासांत १३ हजार १२ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ५७.४२ टक्के आहे. देशात आतापर्यंत २ लाख ७१ हजार ६९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ लाख ८६ हजार ५१४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तसेच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ७ हजार ८७१ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे २४ तारखेपर्यंत ७५ लाख ६० हजार ७८२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

देशात महाराष्ट्रसह दिल्लीत देखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दिल्लीच्या कोरोनाबाधित आकड्याने मुंबईला मागे टाकले आहे. आतापर्यंत दिल्लीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ३९०वर पोहोचली आहे. तर मुंबईची कोरोनाबाधितांची संख्या ६९ हजार ५२८वर आहे. तसेच आतापर्यंत दिल्लीत २ हजार ३६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत ३ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला आहे


हेही वाचा – Corona: अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!