१७ कोटींची रक्कम, १६ तास मोजणी आणि ८ काऊन्टिंग मशीन्स, आमीर खान यांच्या घरात सापडलं घबाड

शनिवारी पहाटे ईडीने छापेमारी केली. त्यानंतर जे घबाड सापडलं त्याची रात्रभर मोजणी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांसह बँकेचे अधिकारी आणि इतर केंद्रीय कर्मचारीही या कारवाईत सहभागी होते.

kolkata ed raid

कोलकत्ता – गेमिंग अॅपमधून बक्कळ पैसा कमावणाऱ्या कोलकत्त्यातील एका व्यावसायिकाच्या घरी ईडीने छापे मारले आहेत. या छापेमारीत ईडीला तब्बल १७ कोटींची रोख रक्कम सापडली असून यामध्ये जुन्या ५००च्या नोटा आणि नव्या २००० आणि २०० च्याही नोटा सापडल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे १७ तासांच्या छापेमारीत ८ काऊन्टिंग मशिन्सने हे पैसे मोजण्यात आले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आमीर खान असं या व्यावसायिकाचं नाव आहे. (17 crore cash, 16 hours, 18 counting machines, ed raids on kolkatta businessman aamir khan)

हेही वाचा – नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, महाराष्ट्रासह १०० ठिकाणी धाडी

कोलकत्त्यातील गार्डन रीच रेसिडन्स येथे राहणारे व्यावसायिक आमीर खान यांच्या घरात ईडीने छापेमारी केली. यावेळी ईडीला त्यांच्या घरात १० ट्रंक सापडले, त्यापैकी ५ ट्रंक पैशांनी भरलेले होते. शनिवारी पहाटे ईडीने छापेमारी केली. त्यानंतर जे घबाड सापडलं त्याची रात्रभर मोजणी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांसह बँकेचे अधिकारी आणि इतर केंद्रीय कर्मचारीही या कारवाईत सहभागी होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या रोख रक्कमेमध्ये ५०० च्या जुन्या नोटा तर २००० आणि २०० च्या नव्या नोटाही सापडल्या आहेत. फेडरल बँक ऑथॉरिटीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी आमीर खान यांच्याविरोधात पार्क स्ट्रिट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर ईडीने आज छापेमारी केली.

हेही वाचा – जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावर, ब्रिटनलाही टाकलं मागे

कुठून आला पैसा?

अमिर खान यांनी ई-नजेस्ट नावाचं एक गेमिंग अॅप्लिकेशन तयार केलं होतं. याअंतर्गत अॅपमधून खेळाडूंना पैसेही मिळायचे. या अॅपच्या वापरकर्त्यांना कमिशन मिळायचं. हे कमिशन अॅपच्या वॉलेटमधून सहज काढता येऊ शकणारं होतं. या अॅपमधून पैसे मिळत असल्याने वापरकर्त्यांनी अधिक पैसे गुंतवायला सुरुवात केली. यामुळे वापरकर्त्यांना अधिकचे पैसे मिळू लागले. मात्र, वापरकर्त्यांनी अधिकचे पैसे टाकल्याने अॅपला मोठ्याप्रमाणात रक्कम मिळाल्यानंतर अॅपने विथड्रॉव्हलची प्रणाली (Withdrawal system) बंद केली. त्यानंतर, वापरकर्त्याच्या प्रोफाईलची माहिती अॅपमधून काढून टाकण्यात आली. यावरून ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी ईडीने कोलकत्त्यात याप्रकरणी सहा ठिकाणी छापे मारले. त्यात आमीर खान यांच्या घरात ईडीने छापे मारल्याने १७ कोटींचं घबाड मिळालं.