घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; १७ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; १७ जणांचा मृत्यू

Subscribe

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सुमारे १७ जणांचा मृत्यू

हिमाचलमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून उत्तराखंडमध्ये ढगफुटीने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशात बऱ्याच वर्षातील सर्वात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये मनाली आणि कुल्लू दरम्यानच्या महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीत ढगफुटी झाली आहे. दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहेत. हिमाचल प्रदेशव्यतिरिक्त उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

- Advertisement -

उत्तरकाशीत पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने एसडीआरएफ, रेड क्रॉस,आयटीबीपी आणि एनडीआरएफचे पथके तैनात करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील आठ जिल्हे मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. येथील मोरी भागातील आराकोट येथे जोरदार पाऊस आणि ढगफुटी झाली असून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. येथे बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर पाठविण्यात आली आहेत. तसेच एसडीआरएफची पथके बचावकार्य करत आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -