India Corona Update Today: देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही घट! 24 तासांत 1761 नव्या रुग्णांची नोंद

शनिवारच्या देशातील कोरोना आकडेवारीच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे.

India Coronavirus Update india reports 1,233 new Covid cases and 33 death in the last 24 hours
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 1 हजारावर; 24 तासात 1233 नवे रुग्ण, 31 मृत्यू

जगातील काही देशांमध्ये कोरोनाने आणि कोरोनाच्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, थायलंड अशा काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसऱ्याबाजूला भारत कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. देशातील काही राज्यांमधील जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. आजही देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून 24 तासांत 1 हजार 761 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

देशात काल, शनिवारी 2 हजार 75 नवे कोरोनाबाधित आढळले होते आणि 71 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होता. या आकडेवारीच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 हजार 1 हजार 761 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 127 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात 26 हजार 240 कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 30 लाख 7 हजार 841वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 5 लाख 16 हजार 479 रुग्णांचा मृत्यू झाला असून 4 कोटी 24 लाख 65 हजार 122 कोरोनामुक्त झाले आहेत.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस 181 कोटींहून अधिक देण्यात आले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 13 लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत 16 लाख डोस 12 ते 14 वयोगटातील मुलांना देण्यात आले आहेत. तर 2 कोटी 17 लाखांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : चौथ्या लाटेच्या चिंतेत महाराष्ट्राला दिलासा, २४ तासात ९७ कोरोनाबाधितांची नोंद, १ रुग्णाचा मृत्यू