नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील मुआन येथील विमानतळावर लॅंडिंग करतानाच एका विमानाचा अपघात झाला आणि तब्बल 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (179 people died in south korea plane crash cause of accident revealed)
दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक विमान रनवेवर उतरले आणि दूरपर्यंत घसरत गेले. काही क्षणातच हे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यातील 179 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परत येत होते. विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. यातील केवळ दोघांचाच जीव वाचल्याचे समजते.
हेही वाचा – IND vs AUS Test : WTC मध्ये बुमराहने रचला इतिहास; केला हा विक्रम
हे अपघातग्रस्त विमान जेजू एअरचे बोइंग 737 – 800 हे होते. दक्षिण कोरियातील वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या वृत्तानुसार, लॅंडिंग करताना विमानाला पक्षी धडकल्याने हा अपघात झाला. पक्षी धडकल्याने विमानाच्या लॅंडिंग गिअरवर परिणाम होऊन हा अपघात झाला. यामुळेच लॅंडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाला आग लागली.
लॅंडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्यावर वैमानिकाने विमान सरळ उतरवण्याचा निर्णय घेतला. पण, ईमर्जन्सी लॅंडिंग दरम्यान विमानाचा वेग कमी होऊ शकला नाही. आणि विमान रनवेच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या कुंपणाला हे विमान जाऊन धडकले. 175 प्रवाशांपैकी 173 कोरियन नागरिक आहेत. तर दोन नागरिक थायलंडचे आहेत.
⚡️DRAMATIC moment South Korean plane with reported 180+ passengers becomes a fireball and crashes at airport CAUGHT on cam pic.twitter.com/VdrdavEXgT
— RT (@RT_com) December 29, 2024
कझाकिस्तानमध्येही झाला अपघात
गेले काही दिवस सातत्याने विमानांचे अपघात होत आहेत. यापूर्वी बुधवारी कझाकिस्तानातील अक्तौ शहराजवळ एम्ब्रेयर प्रवासी विमानाचा अपघात झाला. यात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – NMIA : नवी मुंबई विमानतळाची तारीख ठरली, पहिले प्रवासी विमान लॅंड झाल्यानंतर जल्लोष
Edited by : Ashwini A. Bhatavdekar