घरक्राइमआफताबच्या पॉलिग्राफ चाचणीत विचारले १८ प्रश्न; पोलिसांसमोर आता मोठं आव्हान

आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीत विचारले १८ प्रश्न; पोलिसांसमोर आता मोठं आव्हान

Subscribe

दात आणि जबड्याचा भाग सापडला आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर हा दात आणि जबड्याचा भाग श्रद्धाचा आहे की नाही हे कळू शकणार आहे. जर हे भाग श्रद्धाचे असतील तर या प्रकरणातील हा खूप मोठा पुरावा ठरू शकणार आहे.

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर प्रकरणाचा (Shraddha Murder Case) छडा लावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी आफताबची पॉलिग्राफ (Polygraph Test) चाचणी केली. यासाठी आफताबला पोलीस Forensic Science Laboratory Division (FSL) घेऊन गेले होते. येथे तब्बल साडेतीन तास त्याची तपासणी करण्यात आली. पॉलिग्राफी आधी त्याची प्री-पॉलिग्राफी चाचणी झाली. प्री पॉलिग्राफी चाचणी झाल्यानंतर त्याची पॉलिग्राफी चाचणी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याला जवळपास १५ ते १८ प्रश्न विचारण्यात आले. तसंच, आजही त्याची चाचणी होणार आहे.

हेही वाचा – दिल्लीत पुन्हा हत्याकांड! व्यसनाधीन मुलाने केली घरातील चौघांची हत्या

- Advertisement -

मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात श्रद्धा हत्याप्रकरणावर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी आफताबने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. तसंच, जे झालं ते रागाच्या भरात झालं, असंही त्याने कबुल केलं. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. कालच्याच सुनावणीत त्याच्या पॉलिग्राफी आणि नार्को चाचणीला परवानगी मिळाली. त्यानुसार, Forensic Science Laboratory Division मध्ये त्याची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच, पॉलिग्राफी चाचणी झाल्यानंतर त्याची नार्को चाचणीही करण्यात येणार आहे.

शरीराचे ३५ तुकडे का केले?

रागाच्या भरात आफताबाने श्रद्धाची हत्या केली. त्यांच्यात विविध कारणांवरून वाद होते, त्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, तिची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे का करण्यात आले, या तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. त्यासाठी त्याची चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आफताबच्या घरातील बाथरूममध्ये CFSI ला सापडले रक्ताचे डाग, कोर्टाकडून पॉलिग्राफ टेस्टला परवानगी

श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करण्यात आले असून ते विविध ठिकाणी फेकून देण्यात आले आहेत. तब्बल सहा महिन्यांपूर्वी ही हत्या झाल्याने तिच्या शरीराचे तुकडे शोधणं पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. दरम्यान, दात आणि जबड्याचा भाग सापडला आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर हा दात आणि जबड्याचा भाग श्रद्धाचा आहे की नाही हे कळू शकणार आहे. जर हे भाग श्रद्धाचे असतील तर या प्रकरणातील हा खूप मोठा पुरावा ठरू शकणार आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन महत्त्वाची माहिती समोर आली आहे. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे कुठे कुठे फेकले याची माहिती देण्याकरता आफताबने काल नकाशा तयार केला होता. आता या नकाशानुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तर, आफताबच्या घरातून एक सूचना वही जप्त करण्यात आली आहे. यामध्ये त्याने श्रद्धाच्या तुकड्यांचा हिशोब लिहिला आहे. म्हणजेच, त्याने कोणते तुकडे कुठे फेकले याची माहिती त्यात नमूद केली आहे. आफताब श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या शरीराचा एक एक तुकडा रात्री अडीच वाजता फेकून यायचा.

हेही वाचा – पुण्यातील सेक्सटॉर्शनचे धागेदोरे राजस्थानमध्ये, गावातील २५०० जणांचं रॅकेट उघडकीस

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -