घरक्राइमअयोध्येत मोठ्या घातपाताचा प्रयत्न; आढळले बेवारस 18 हातबॉम्ब

अयोध्येत मोठ्या घातपाताचा प्रयत्न; आढळले बेवारस 18 हातबॉम्ब

Subscribe

भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या निर्मलीकुंड येथील रस्त्याच्या लगतच्या झुडपात हे हातबॉम्ब आढळले आहे

श्रीप्रभु रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र हे प्रयत्न सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे फसले आहे. अयोध्येतील कॅन्ट परिसरात सोमवारी दुपारी जवळपास डझनभर हातबॉम्ब सापड्ल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे अयोध्या नगरी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची शक्यता बळावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेवारस हातबॉम्ब आढळल्याने सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. लष्कराच्या मदतीने हे हातबॉम्ब जप्त करत नष्ट करण्यात येत आहेत. दरम्यान दहशतवादीविरोधी पथकाला पाचारण करत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. मात्र हे हातबॉम्ब कशासाठी आणि कोणी आणले होते? याचा शोध पोलिसांकडून सुरु असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या निर्मलीकुंड येथील रस्त्याच्या लगतच्या झुडपात हे हातबॉम्ब आढळले आहे. सर्वप्रथम स्थानिक रहिवाश्यांना हे बॉम्ब झुडपात आढळले यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ ही माहिती मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकाऱ्यांना पोहचवली, यावेळी पोलिसांसह मिलिटरी इंटेलिजन्सने घटनास्थळी धाव घेत हातबॉम्ब ताब्यात घेतले. आसपासच्या झाडाझुडपांमध्ये जवळपास 10 ते 12 हातबॉम्ब पडलेले होते. कोणतीही दुर्घटना होई नये यासाठी जप्त केलेले हॅण्डग्रेनेड सध्या नष्ट करण्यात आले आहे. मात्र लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राजवळ काही फूट अंतरावरील झुडपात हातबॉम्ब कसे पोहचले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. निर्मलीकुंड हा रहिवासी परिसर असल्याने याला  संवेदनशील परिसर म्हणून ओळखले जाते. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हातबॉम्ब मिळाल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे.


कोणता मुख्यमंत्री येणार विठ्ठलाच्या दारी? उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -