घरताज्या घडामोडीUkraine Indian student: युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी मानले सरकारचे आभार, युक्रेनमधून १८२...

Ukraine Indian student: युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी मानले सरकारचे आभार, युक्रेनमधून १८२ विद्यार्थी भारतात परतले

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला युक्रेन विरोधात स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधून १८२ विद्यार्थी भारतात परतले आहेत. बहुतांश विद्यार्थी यूकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तसेच यामध्ये आयुषी आणि हर्षिता हे दोन विद्यार्थी भोपाळचे रहिवासी आहेत. दिल्लीला पोहोचल्यानंतर दोन्ही विद्यार्थी शताब्दी एक्सप्रेस ट्रेनने राजधानीला पोहोचले आहेत. कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत सरकराचे आभार मानले आहेत. हर्षित या विद्यार्थ्याने देखील सरकारचे आभार मानले आहेत.

युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. तर १८ हजारांहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. मागील ७२ तासांपासून भारतीयांना एअरलिफ्ट करण्याचे ऑपरेशन सुरू आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतले आहे. यामध्ये १८२ विद्यार्थ्यींसह भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

भारतीय विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या काळासाठी युक्रेन सोडावं. विद्यापीठाकडून ऑनलाईन लेक्चर्ससंदर्भात अधिकृत सूचना जारी होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी मायदेशी परतावं, असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत सुरू राहावं यासाठी भारतीय दूतावास संबंधित यंत्रणांशी समन्वय करत आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एअर इंडियाचे विमान AI1947 मंगळवारी नवी दिल्लीहून कीवकडे निघाले. २५० हून अधिक भारतीयांना भारतात आणण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Russia Ukraine War: रशियाने मिसाईलने युक्रेनचे विमानतळ आणि लष्करी तळ केले उद्ध्वस्त; ५ विमानं पाडली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -