घरताज्या घडामोडीपाकिस्तानात रेल्वेची बसला धडक; भीषण अपघातात १९ शीख यात्रेकरुंचा मृत्यू

पाकिस्तानात रेल्वेची बसला धडक; भीषण अपघातात १९ शीख यात्रेकरुंचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक भीषण अपघात झाला आहे. जवळपास २९ शीख यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या एका मिनी बसला रेल्वेगाडीची धडक बसली. या अपघातात १९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. पाकिस्तानच्या शेखुपुरा जिल्ह्यात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

पाकिस्तान मधील फारुकाबाद रेल्वे स्थानकानजीक हा अपघात घडला. मिनी बसमधील सर्व शीख बांधव हे पंजाबमधील नानकाना साहिब गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते लाहोरला परतत होते. यावेळी फारुकाबाद स्टेशननजीक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात घडला. या रेल्वे क्रॉसिंगला गेट नव्हते, अशी माहिती मिळत आहे. कराचीहून येत असलेल्या शाह हुसेन एक्सप्रेसने शीख बांधवाच्या मिनी बसला धडक दिली.

- Advertisement -

ईटीपीबीचे प्रवक्ते आमीर हाश्मी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मिनी बसमध्ये शीख बांधव होते. पेशावर मधील नानकाना साहिब गुरुद्वारातून परतत असताना हे सर्व लोक फारूकाबाद येथील सच्चा सौदा गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते.

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी या अपघातासाठी दोषी असलेल्यांवर चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन अतीव दुःख झाले असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -