घरक्रीडाWrestlers Protest: गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन

Wrestlers Protest: गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन

Subscribe

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. कुस्तीपटू बजरंग पूनिया, साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. यावेळी कुस्तीपटूंना देशातील दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळाला आहे. प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि कपिल देव (Kapil Dev) यांच्यासारखे दिग्गज आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन

1983चा विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ आता आंदोलन करणाऱ्या स्टार कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ निवेदन देताना 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने म्हटलं आहे की, अशा घटनांमुळे आम्ही निराश आहोत. दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे की, कुस्तीपटू आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा विचार करत आहे. अनेक वर्षे मेहनत, त्याग आणि संयमाने कुस्तीपटूंनी अशी पदकं मिळवली जी देशासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.

- Advertisement -

असे निर्णय घाईघाईत घेऊ नका

सुनील गावसकर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, के श्रीकांत, सय्यद किरमाणी, यशपाल शर्मा, मदन लाल, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री हे देखील 1983 च्या अंतर्गत विश्वचषक जिंकणाऱ्या संघात होते. यातच गावस्कर आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांनी कुस्तीपटूंना आवाहन केलं आहे की, असे निर्णय घाईघाईत घेऊ नका. त्याचबरोबर कुस्तीपटूंच्या मागण्या आणि तक्रारी ऐकून लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

आंदोलनप्रकरणी IOCचं भारताला आव्हान

स्वित्झर्लंडच्या लुसानेमधील IOCचे प्रवक्ते यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. तेव्हा ते म्हणाले की, २८ मे रोजी भारतीय कुस्तीपटूंसोबत ज्याप्रकारचं गैरवर्तन करण्यात आलं. तसेच त्यांना मारहाण करण्यात आली आणि अनेक तास त्यांना अटक करण्यात आली. हे अत्यंत दुर्देवीपणाचं लक्षण आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार IOCने आरोपींच्या निष्पक्षतेबाबत सांगितलं की, या कुस्तीपटूंच्या सुरक्षतेबाबत विचार करण्यात यावा. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. आयओसीने पीटी उषाच्या अध्यक्षतेखालील भारतीय ऑलम्पिक असोसिएशन (IOA)ला एक विनंती करण्यात आलीय की, भारतीय कुस्तीपटूंच्या सुरक्षतेसाठी तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढं उचलावं. तुम्ही या प्रकरणी गप्प का आहात?, दोन ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या आणि भारतीय कुस्तीपटूंसोबत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम IOC करण्यात येणार आहे.

पोलिसांनी कुस्तीमध्ये भारताला मेडल पटकावून देणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, पैलवान बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले. यानंतर आता कुस्तीपटुंनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानुसार, आंदोलक कुस्तीपटू यांनी रक्ताचं पाणी करुन कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला. पण तत्काळ हा निर्णय मागे घेण्यात आला.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कुस्तीगीरपटूंचे आरोपी असलेले भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचं घेण्यात आलं नव्हतं. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलं आहे. परंतु IOC ने सांगितलं की, कुस्तीगीर पटूंनी ज्याप्रकारचे आरोप सिंह यांच्यावर केले आहेत. त्याप्रमाणे त्यांची चौकशी होणं खूप गरजेचं आहे.

आंदोलक कुस्तीपटूंना UWWचा पाठिंबा

अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत. आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत, असे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) सांगितले आहे.

आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत. शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील, असं UWWम्हणाले.


हेही वाचा : कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला मागे, शेतकरी नेत्यांनी काढली समजूत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -