घरदेश-विदेश१९८४च्या दंगलप्रकरणी एकाला फाशी, एकाला जन्मठेप!

१९८४च्या दंगलप्रकरणी एकाला फाशी, एकाला जन्मठेप!

Subscribe

१९८४ साली देशात उसळलेल्या दंगलींमधील एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने दोघा आरोपींना शिक्षा सुनावली आहे. एका आरोपीला फाशी तर दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात अनेक ठिकाणी शीख विरोधी दंगल उसळली होती. या दंगलीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली होती. यातल्याच एका प्रकरणामध्ये दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने तब्बल ३४ वर्षांनंतर निकाल दिला आहे. या निकालामध्ये दोघा आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये एकाला जन्मठेप तर दुसऱ्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने जाहीर केली आहे. नरेश सहरावत आणि यशपाल सिंह अशी या दोघांनी नावं आहेत. मागील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर मंगळवारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

…म्हणून उसळल्या दंगली!

१९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दंगलीच्या अनेक घटना घडल्या होत्या. इंदिरा गांधी यांची हत्या करणारे दोघे आरोपी हे शीख समाजातले असल्यामुळे शीखविरोधी वातावरण तापलं होतं. त्यातच देशात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. या दंगलींबाबत नंतर अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. अशाच एका प्रकरणाची सुनावणी दिल्लीतल्या स्थानिक न्यायालयात सुरू होती. यामध्ये दिल्ली न्यायालयाने आरोपींनी जन्मठेप आणि फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisement -

बंद केली होती केसची फाईल!

आरोपींना काय शिक्षा दिली जावी, यासाठी दोन्ही पक्षाच्या वकिलांकडून न्यायालयासमोर दावे करण्यात आले होते. पीडित कुटुंबांच्या वकिलांनी आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्याची विनंती केली होती. तर बचाव पक्षाकडून दयेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने देखील गंभीर गुन्हा असल्याचं सांगत कठोर शिक्षेची मागणी केली होती. १९९४ साली पुराव्यांच्या अभावी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली होती. त्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांनी जोरदार आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर एसआयटीची स्थापना करून तपास पुन्हा सुरू करण्यात आला होता.


हेही वाचा – गुजरात दंगल : पंतप्रधान मोदींबाबत सोमवारी सुनावणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -