घरताज्या घडामोडीदिलासादायक! देशभरात 1994 नवे कोरोना रुग्ण; रुग्णवाढीचा वेग मंदावला

दिलासादायक! देशभरात 1994 नवे कोरोना रुग्ण; रुग्णवाढीचा वेग मंदावला

Subscribe

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव घटना असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, देशात 1994 नवे कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव घटना असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, देशात 1994 नवे कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या आकडेवारीनुसार, 118 रुग्ण कमी झाले असून, शनिवारी देशात 2112 रुग्ण आणि 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांसह कोरोना मृतांची संख्याही घटली आहे.

कोरोनाच्या 1994 नवीन रुग्णांमुळे भारतात आतापर्यंतच्या कोविड-19 विषाणूबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 42 हजार 742 वर पोहोचली आहे. यापैकी 4 कोटी 40 लाख 90 हजार 349 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

देशात कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 28 हजार 961 जणांनी प्राण गमावले आहेत. भारतात विक्रमी कोरोना लसीकरण झालं आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर आहे.

सध्या देशात 23 हजार 432 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 601 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली. देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 961 वर पोहोचली. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिवाळीनंतर फराळ बनवा; आनंदाचा शिधा वाटपाला आजपासून होणार सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -