घरदेश-विदेशआजपासून 'या' ६ नियमांत बदल

आजपासून ‘या’ ६ नियमांत बदल

Subscribe

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला काही नियमांत बदल होतात. अशातच आज १ मे पासून ही काही नियम बदलले गेले आहेत. आज ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी कमर्शियल घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १७१.५० रुपयांची कपात केली आहे. त्यानंतर आज दिल्लीत १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर हा १८५.५० रुपये झाला आहे. तर घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर सीएनजीच्या किंमतीत ही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

-म्युचअल फंडाचे नियम
सेबीने म्युचअल फंडाच्या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता म्युचअल फंडात गुंतवणूकदाराना वॉलेटला आरबीआयच्या केवायसीला जोडावे लागणार आहे.

- Advertisement -

-जीएसटीच्या नियमात बदल
आजपासून जीएसटीच्या नव्या नियमानुसार आता १०० कोटींपेक्षा अधिक टर्नओवर असणाऱ्या व्यायवसायिकांना आपल्या ट्रांजेक्शनची रिसिप्ट IRP म्हणजेच इनवॉस रजिस्ट्रेशन पोर्टलवर ट्रांजेक्शनच्या ७ दिवसात अपलोड करावी लागणार आहे. मर्यादित कालावधीत ते अपलोड न केल्यास तर रिसिप्ट अपलोड होणार नाही.

-बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना दिलासा
बॅटरीच्या माध्यमातून चाहणाऱ्या वाहनांचे नियम सुद्धा १ मे पासून बदलले गेले आहेत. आजपासून आता या वाहनांवर परमिट चार्ज लागणार नाही.

- Advertisement -

-ATM ट्रांजेक्शवर लागणार चार्ज
हा सुद्धा नियम आजपासून लागू झाला आहे. परंतु सध्या हा नियम पीएनबी कडून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या खातेधारकांचे या बँकेत खाते असेल आणि ते एटीएमच्या माध्यमातून ट्रांजेक्शन केल्यास त्यांच्या अकाउंटमध्ये पुरेशी रक्कम नसेल तर बँक खातेधारकावर एटीएम ट्रांजेक्शन चार्ज लागणार आहे. हा चार्ज १० रुपये अधिक जीएसटी असा असणार आहे.

-फेक कॉल आणि एसएमएस बंद होणार
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार ट्राय एक फिल्टर स्थापित करणार आहे. त्यामुळेच फोनवर येणारे बनावट कॉल्स आणि एसएमएस हे आता बंद होणार आहे. त्याचसोबत अज्ञात युजर्सला अज्ञात कॉल्स आणि मेसेज ही येणार नाहीत.

-पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल नाही
आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ९६.७२ रुपये तर डिझेल हे ८९.६२ रुपये प्रतिलीटर आहे.

हेही वाचा- LPG Cylinder : व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, मात्र…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -