Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नवं संकट! पुन्हा एकदा प्राण्यातून माणसात पसतोय नवा व्हायरस - WHO

नवं संकट! पुन्हा एकदा प्राण्यातून माणसात पसतोय नवा व्हायरस – WHO

Related Story

- Advertisement -

जगभरात अजूनही कोरोनाचं संकट कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका अजूनही आहे. याच दरम्यान कोरोनाचे जीवघेणे व्हेरियंट आढळत आहेत. असे असतानाच आता जगावर नवं संकट घोघावत आहे. गिनी या देशात मारबर्ग व्हायरस (Marburg Virus) पसरल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. पश्चिम आफ्रिकेतील आतापर्यंतची ही पहिली केस आहे. इबोला आणि कोरोनाप्रमाणे मारबर्ग व्हायरस प्राण्यातून माणसात पसरला असल्याची माहिती डब्ल्यूएचओने दिली आहे.

डब्ल्यूएचओ सांगितले की, ‘हा व्हायरस वटवाघळापासून पसरत आहे आणि याचा मृत्यूदर ८८ टक्क्यांपर्यंत आहे. २ ऑगस्टला दक्षिण गुएकेडौ प्रांतमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या नमुन्यात मारबर्ग व्हायरस आढळला. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या व्यक्तीत इबोला नाही तर मारबर्ग व्हायरल दिसून आला.’

- Advertisement -

दोन महिन्यांपूर्वी डब्ल्यूएचओने इबोला व्हायरस नाहीसा झाल्याची घोषणा केली होती, त्यातच गिनीमध्ये मारबर्ग व्हायरस आढळला आहे. गेल्या वर्षी आफ्रिकेत इबोला व्हायरसच्या फैलावाची सुरुवात झाली होती, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. या व्हायरसबाबत डब्ल्यूएचओ म्हणाले होते की, याचा धोका प्रादेशिक स्तरावर जास्त आणि जागतिक स्तरावर कमी आहे.

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, मारबर्ग व्हायरस सहसा गुहेत किंवा खाण्यांमध्ये असतो, जेथे वघवाघूळ राहतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला याचा संसर्ग होतो त्यानंतर शरीरातून निघणारे द्रवपदार्थ, दूषित पृष्ठभाग आणि सामग्रीच्या संपर्कातून हा व्हायरस पसरतो.


- Advertisement -

हेही वाचा – समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होतानाच सतत पूर येण्याची शक्यता, IPCC अहवाल


- Advertisement -