Corona: जगात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत २.१५ लाख नवीन रुग्ण

भारत आणि रशियामध्ये कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे.

2.15 lakh corona patient found in 24 hours in the world
Corona: जगात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत २.१५ लाख नवीन रुग्ण

संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची आकडा वाढत आहे. गेल्या २४ तासांत २.१५ लाख कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५ हजार ३११ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात १ कोटी ३४ लाख ५६ हजार ३४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ लाख ८१ हजार १५४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत ७८ लाख ४७ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता ५० लाख रुग्ण Active आहेत.

दरम्यान अमेरिका अजूनही सर्वात जास्त कोरोना प्रभावित देश असून कोरोनाबाधितांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेचा ३५ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यापैकी १ लाख ३९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. ब्राझीलमध्ये १९ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ब्राझीलनंतर भारत आणि रशियात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहे.

या १० देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या

अमेरिका : कोरोनाबाधित – ३,५४५,०७७ – मृत्यू – १३९,१४३
ब्राझील : कोरोनाबाधित – १,९३१,२०४ – मृत्यू – ७४,२६२
भारत : कोरोनाबाधित – ९३७,४८७ – मृत्यू – २४,३१५
रशिया : कोरोनाबाधित – ७३९,९४७ – मृत्यू – ११,६१४
पेरू : कोरोनाबाधित – ३३३,८६७ – मृत्यू – १२,२२९
चिली : कोरोनाबाधित – ३१९,४९३ – मृत्यू – ७,०६९
मॅक्सिको : कोरोनाबाधित – ३११,४८६ – मृत्यू – ३६,३२७
स्पेन : कोरोनाबाधित – ३०३,६९९ – मृत्यू – २८,४०९
साउथ आफ्रिका : कोरोनाबाधित – २९८,२९२ – मृत्यू – ४,३४६
ब्रिटन : कोरोनाबाधित – २९१,३७३ – मृत्यू – ४४,९६८


हेही वाचा – Corona Live Update: चंद्रपूर शहरात १७ ते २० जुलैपर्यंत लॉकडाऊन