घरदेश-विदेशJammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड; दोन AK-47 रायफल जप्त

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड; दोन AK-47 रायफल जप्त

Subscribe

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांच्या एका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या ठिकाणाहून लष्कराने दहशवाद्यांनी लपून ठेवलेली शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील नूरकोट भागात लष्कराच्या तुकड्या आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने ही संयुक्त कारवाई केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कराच्या तुकड्या आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन सुरु केले आहे. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्धवस्त करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. माहितीनुसार, या कारवाईदरम्यान जवानांनी दोन मॅगझिनसह दोन एके-47 आणि 63 राउंड, एक 223 बोअर एके बंदूक, दोन मॅगझिन, 20 राऊंड आणि एक मॅगझिनसह एक चायनीज पिस्तूल जप्त केली आहेत. रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

जवानांवरील हल्ले सुरुच

जम्मू – काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी सुरु आहेत. दरम्यान यात ग्रेनेड हल्लेचे प्रमाण वाढत आहेत. अलीकडेच काश्मीरमधील एका महिला जवानांच्या तळावर ग्रेनेड हल्ले करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या महिनेने सीआरपीएफच्या चेक पोस्टवर पेट्रोल बॉम्ब फेकला होता. या घटनेचे सीसीटीव्ह व्हिडीओ आता माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बंकरवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करणाऱ्या एका महिलेला काही तासांतच अटक करण्यात आली आहे.


Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्जिकल स्ट्राईक ; दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच केलं मोठं धाडस


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -