घरदेश-विदेश२००७ हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरणात २ आरोपी दोषी

२००७ हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरणात २ आरोपी दोषी

Subscribe

२००७ साली झालेल्या हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात अनिक शफिक सईद आणि इस्माईल चौधरी या दोघांना दोषी ठरविले आहे. तर इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२००७ साली हैद्राबादमधील गोकुळ चाट आणि लुम्बिनी पार्क येथे २ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये ४२ लोकांचा जीव गेला होता, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. तर या स्फोटांनंतर पोलिसांना जिवंत स्फोटकंही मिळाली होती. या प्रकरणात ११ वर्षांनी पीडितांना न्याय मिळाला आहे.

अनिक शफिक सईद आणि इस्माईल चौधरी हे दोघे दोषी 

या प्रकरणामध्ये अनिक शफिक सईद आणि इस्माईल चौधरी या दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. या दोघांच्या शिक्षेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. तर इतर दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात १७९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ हे दोघे या स्फोटांचे मास्टरमाईंड होते. पण हे दोघे अजूनही फरार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -