Corona Virus Update : देशात २४ तासांत २ हजार २२८ नवे कोरोना रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू

देशात कोरोनाबाधित (Corona Virus ) रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात २ हजार २२८ इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ५ लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५ लाख २४ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू (Deaths) झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे. सध्या देशातील रूग्ण संख्या १७ हजार ८७ पर्यंत पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ हजार ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनातून मुक्त (Discharge) झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २६ लाख ११ हजार ३७० वर पोहोचली आहे. सध्या देशात १७ हजार ८७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशातील रिकव्हरी (Recovery Rate) रेट ०.६० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा : MonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; ‘या’ राज्याकडून अलर्ट जारी

राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron Varient) नवीन रूग्ण आढळून आले आहेत. पहिल्यांदा बी ए. ४ व्हेरियंटचे चार आणि बी. ए ५ व्हेरियंटचे तीन रूग्ण आढळले आहेत. राज्यात आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे.

जगभरात कोरोनानंतर आता मंकीपॉक्स या नव्या आजाराची दहशत पाहायला मिळतेय. आत्तापर्यंत २१९ हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.


हेही वाचा : Power Crisis India : देशात विजेचे संकट गंभीर; 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोल इंडिया कोळसा करणार आयात