घरCORONA UPDATEधक्कादायक, हैदराबाद IPS ट्रेनिंग अकादमीमध्ये कोरोनाचा शिरकाव!

धक्कादायक, हैदराबाद IPS ट्रेनिंग अकादमीमध्ये कोरोनाचा शिरकाव!

Subscribe

देशभरात कोरोनाचा फैलाव होत असताना आता देशातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या आयपीएस अर्थात इंडियन पोलीस सर्व्हिस (भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग सुरू असलेल्या हैदराबाद अकॅडेमीमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अकादमीमधले दोन ट्रेनी आयपीएस अधिकारी आणि एका लायब्ररी सहय्यकाला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या प्रकारामुळे हैदराबाद अकादमीमध्ये खळबळ उडाली आहे. या अकादमीमध्ये अनेक ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग सुरू असून तिथेच कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे पोलीस अधिकारी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हैजराबादमध्ये असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीमध्ये युपीएससी स्पर्धा परीक्षेतून उत्तीरण झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं. याच ठिकाणहून ट्रेनिंग घेऊन हे आयपीएस अधिकारी देशभरात त्यांच्या केडरनुसार नियुक्तीवर पाठवले जातात. मंगळवारी अकादमीमधल्या २ ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यासोबतच अकादमीच्या ग्रंथालयातला सहाय्यक ग्रंथपाल देखील कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं.

- Advertisement -

मंगळवारी अकादमीमधल्या एकूण १३१ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये सर्व ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे अहवाल आज सादर झाले असून १३१ पैकी २ ट्रेनी आयपीएस आणि एका लायब्ररीयनचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांना लागलीच होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांना अगदीच अल्प प्रमाणात लक्षणं जाणवत होती. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती अकादमीतल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -