घरराजकारणगुजरात निवडणूकतरुणांना 20 लाख नोकर्‍या, विद्यार्थिनींना स्कुटी; गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

तरुणांना 20 लाख नोकर्‍या, विद्यार्थिनींना स्कुटी; गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सत्ताधारी भाजपने शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सत्ताधारी भाजपने शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना डोळ्यासमोर ठेवून 20 लाख तरुणांना रोजगार, तसेच विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक स्कुटी, 2 एम्स स्तरावरील संस्थांची स्थापना आणि 10 लाखांचा आरोग्य विमा यांसह अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. (20 lakh jobs for youth scooters for girl students BJP Manifesto for Gujarat Elections)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी गांधीनगर येथील प्रदेश कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुजरात ही संतांची भूमी आहे. भाजप सरकार जे सांगतं तेच करते. आम्ही संविधानाचे पालन करत असतो. आमच्या या संकल्प पत्राने गुजरातचा नक्की विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, संविधान हा आपला सर्वात मोठा धर्म आहे, त्याचं पालन करणं आणि ते सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत ‘सिंचन योजना’ पुढं नेण्यासाठी आम्ही 25 हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यासह आम्ही दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये 2 सी फूड पार्क उभारणार आहोत, असेही नड्डांनी जाहीर केले.

भाजपच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने

- Advertisement -
  • भाजपच्या जाहीरमान्यात आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आता 10 लाख करण्यात येणार आहे.
  • पुढील 5 वर्षात गुजरातमधील तरुणांना 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचं रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केलं जाईल.
  • 3 सिव्हिल मेडिसिटी, 2 एम्स स्तरावरील संस्था, विद्यमान रुग्णालये, सीएचसी आणि पीएचसीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा महाराजा श्री भागवत सिंह स्वास्थ्य कोष तयार केला जाणार आहे.

हेही वाचा – मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार, तीन गॅस सिलिंडर मोफत; हिमाचलसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -