घरक्राइमबांगलादेशमध्ये नदीत बोट बुडून 20 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

बांगलादेशमध्ये नदीत बोट बुडून 20 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Subscribe

पंचगड (बांगलादेश) – बांगलादेशातील पंचगड जिल्ह्यातद ओव्हलोड बोट नदीत बलटून 20 जणांचा मृत्यू झाल आहे. या दुर्घटनेतील अनेक नागरिकही बेपत्ता आहेत. रविवारी रात्रीपर्यंत बचावकार्य सुरू होते. उत्तर पंचगडचे जिल्हा प्रशासक झहरुल इस्लाम यांनी सांगितले की, या अपघातामध्ये झालेल्या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

जिल्हा प्रशासक इस्लाम यांनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बोटीत 70 हून अधिक लोक असल्याचे सांगीतले. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. दरम्यान बेपत्ता लोकांची नेमकी संख्या माहित नसल्याचे ते म्हणाले. यावेळी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

यापूर्वी अनेक अपघात –

- Advertisement -

बांगलादेश गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खालच्या मार्गावर स्थित आहे. बांगलादेशाला 230 नद्यांनी वेढलेले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मालवाहू जहाजावर प्रवासी फेरी आदळून आणि बुडाल्याने झालेल्या अपघातात सुमारे 37 जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये, देशाच्या दक्षिणेकडील भोला बेटाजवळ ओव्हरलोड ट्रिपल डेकर बोट उलटल्याने किमान 85 लोक बुडाले होते. त्यानंतर एका आठवड्यानंतर, आणखी एक बोट बुडाली आणि 46 लोकांचा मृत्यू झाला. या वर्षात आतापर्यंत बांगलादेशात अनेक छोट्या बोटींच्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -