घरदेश-विदेशआजपासून २०० विशेष रेल्वे गाड्या धावणार

आजपासून २०० विशेष रेल्वे गाड्या धावणार

Subscribe

भारतीय रेल्वे १ जूनपासून २०० नवीन गाड्या चालवणार आहे. यासाठी नवे नियम जारी केले आहेत.

भारतीय रेल्वे सोमवारी १ जूनपासून २०० नवीन गाड्या चालवणार आहे. या गाड्या सध्या कार्यरत असलेल्या १५ कामगार आणि एसी विशेष गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील. २१ मेपासून या गाड्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. प्रवाशांना आता या गाड्यांसाठी १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांपूर्वी रिजर्वेशन करता येणार आहे.

तथापि, १ जून म्हणजेच आजपासून धावणाऱ्या या गाड्यांवरील प्रवासासंदर्भात रेल्वेने प्रवाश्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार केले आहेत, ज्याचं पालन करणे बंधनकारक आहे. रेल्वेने जारी केलेले नियम आणि मार्गदर्शक तत्वे आधीपासूनच कार्यरत असलेल्या १५ एसी विशेष गाड्यांमध्येही लागू होतील.

- Advertisement -

काय आहेत रेल्वेचे नियम

१. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या २०० गाड्यांसाठी अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल अ‍ॅप व्यतिरिक्त रेल्वे स्टेशन काउंटर, टपाल कार्यालये, प्रवासी तिकीट सुविधा केंद्र, अधिकृत एजंट, प्रवासी आरक्षण प्रणाली आणि सामान्य सेवा केंद्रांकडूनही तिकीट बुक करता येणार आहे.

२. रेल्वेने सर्व विशेष गाड्यांसाठी आगाऊ आरक्षणचा कालावधी (एआरपी) ३० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढवलं आहे. यात १२ मेपासून राजधानीच्या रेल्वे मार्गावर चालणार्‍या १५ जोड्या गाड्यांचा आणि १ जूनपासून धावणाऱ्या २०० गाड्यांचा समावेश आहे. म्हणजेच प्रवाशांना १२० दिवस आधी या गाड्यांचे तिकीट बुक करता येणार आहे. यातून १ जूनपासून प्रवाशांना तत्काळ तिकिटांची आणि प्रवासासाठी चालू बुकिंगची सुविधा मिळू शकेल. म्हणजेच प्रवाश्यांना १ जून रोजी प्रवासासाठी ३१ मे रोजी तत्काळ तिकिट मिळू शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – तेव्हा सरकार तरले… आता कसे पडेल? ‘सामना’ तून फडणवीसांना सवाल


३. प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला विना आरक्षित (यूटीएस) तिकीट दिले जाणार नाही किंवा अन्य कोणतेही तिकिटही दिले जाणार नाही. म्हणजेच प्रवासादरम्यान तिकीट तपासणी अधिकाऱ्याला तिकीट देण्याचा अधिकार असणार नाही.

४. नव्या नियमांनुसार आरएसी आणि वेटिंग तिकिट दिलं जाईल. तथापि वेटिंग तिकीट असलेल्या व्यक्तीला ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही. सध्याच्या नियमांनुसार एसी १ मध्ये २०, एसी २ मध्ये ५०, एसी ३ मध्ये १०० आणि स्लीपर कोचमध्ये २०० वेटिंग तिकीट बुक करता येणार आहेत.

५. पहिला चार्ट ट्रेनच्या चालू वेळेच्या कमीतकमी ४ तास आधी तयार केला जाईल आणि दुसरा चार्ट निर्धारित सुटण्याच्या वेळेच्या किमान २ तास आधी तयार केला जाईल. आतापर्यंत दुसरा चार्ट ३० मिनिटांपूर्वी तयार केला जात होता. पहिल्या आणि दुसर्‍या चार्टच्या तयारी दरम्यान फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगला परवानगी असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -