घरअर्थजगतआता 1000 रुपयांची नोट परत येणार? RBIची नवी योजना काय?

आता 1000 रुपयांची नोट परत येणार? RBIची नवी योजना काय?

Subscribe

आता असा अंदाज लावला जात आहे की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बाजारात 1000 रुपयांच्या नोटा परत येऊ शकतात का? या संदर्भात सोमवारी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी उत्तरं दिली आहेत

RBI ने 2000 च्या नोटा बाद करण्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. तेव्हापासून लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, याबाबत अधिक काळजी करण्याची गरज नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सर्व प्रश्नांची उत्तरे देत स्पष्ट केले आहे. कारण 2000 च्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून चालू राहतील. RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी एक, दोन नाहीतर तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मे 2023 पासून म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, लोक 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलू शकतील किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करु शकतील. दरम्यान, आता असा अंदाज लावला जात आहे की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बाजारात 1000 रुपयांच्या नोटा परत येऊ शकतात का? ( Now the 1000 rupee note will return What is RBI s new plan )

या संदर्भात सोमवारी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी उत्तरं दिली आहेत. या मुद्द्यावरही आरबीआय गव्हर्नरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. 500 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या असल्या तरी 1000 च्या नोटांऐवजी 2000 च्या नोटा आल्या. असे उत्तर आरबीआय गव्हर्नर यांनी दिले. आता रिझव्‍‌र्ह बँक 2000 ची नोट परत घेत असताना 1000 ची नोट परत येऊ शकते असा अंदाज लोक बांधत आहेत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सोमवारी सांगितले की, ₹2,000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत, परंतु ₹1,000 च्या नवीन नोटा चलनात आणण्याची कोणतीही योजना नाही.

- Advertisement -

ते म्हणाले की, मी तुम्हाला खात्री देतो, आमच्याकडे पुरेशा चलनी नोटा आहेत ज्या आधीच छापल्या गेल्या आहेत. या छापील नोटा केवळ आरबीआयकडेच नाहीत तर करन्सी चेस्टमध्येही कार्यरत आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

( हेही वाचा: आजपासून ‘नोटबदली’ ; 2000 ची नोट कशी बदलून घ्याल? जाणून घ्या सविस्तर )

- Advertisement -

खरं तर, अशी अटकळ आहे की ₹ 2000 ची नोट काढून घेण्याच्या निर्णयामुळे एकूण चलन पुरवठ्यावर दबाव येऊ शकतो. मात्र, आरबीआयने असा दावा फेटाळला आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीबद्दल बोलताना, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की त्यासाठी एक तारीख निश्चित करण्यात आली आहे जेणेकरून लोक या प्रक्रियेला गांभीर्याने घेतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -