घरCORONA UPDATECorona Update: देशात कोरोनामुळे एका दिवसात २००३ जणांचा बळी!

Corona Update: देशात कोरोनामुळे एका दिवसात २००३ जणांचा बळी!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. मागील २४ तासांत देशात २ हजार ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १० हजार ९७४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात मृत्यूची नोंद वाढल्याने देशातल्या मृत्यू संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ५४ हजार ६५वर पोहोचला असून मृतांचा आकडा ११ हजार ९०३ झाला आहे. तसेच देशात १ लाख ५५ हजार २२७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १ लाख ८६ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशांचा रिकव्हरी रेट ५२.७९ टक्के आहे.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात १ लाख १३ हजार ४४५ कोरोनाचे रुग्ण आढळले असून ५ हजार ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ६० हजार २२८ रुग्ण आढळले आहेत. तसेच ३ हजार १६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण तमिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले आहेत. तसेच देशात एकूण आठ राज्यात १० हजारांहून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात या राज्यात सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले आहेत. या राज्यात मृतांचा आकडा एक हजारांहून अधिक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबादकरांची चिंता वाढली! जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजार पार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -