घरदेश-विदेशमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सातही जणांवर आरोप निश्चित

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सातही जणांवर आरोप निश्चित

Subscribe

मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणी झालेल्या सुनावणीत सातही जणांवर आरोप निश्चिती झाली असून २ नोव्हेंबरपासून या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणी सातही जणांवर आरोप निश्चिती झाली असून त्यांच्यावर हत्या, षडयंत्र आणि कट रचण्याचा आरोप लावण्यात आला आहे. एनआयए कोर्टाने मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला आहे. यामधील सर्व आरोपींनी त्यांवरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तब्बल १० वर्षानंतर या ७ जणांवर आरोप निश्चित झाले आहेत. त्यामुळे कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, मेजर रमेश उपाध्यय, समीर कुलकर्णी यांच्यावरील आरोप निश्चित झाले आहेत. तर पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. २ तारखेपासून खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

यूपीएच्या काळात देशामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा आरोप या सात जणांवर करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या, यापूर्वी एनआयएनेच मला सर्व आरोपातून मुक्त केले होते. आता पुन्हा माझ्यावर आरोप लावण्यात आले आहेत. काँग्रेसने आमच्या विरोधात हा कट रचला आहे. पण मला खात्री आहे की या प्रकरणातूनही माझी निर्दोष सुटका होईल आणि सत्य काय आहे हे लोकांसमोर येईल.

- Advertisement -

यापूर्वी एनआयए कोर्टाने कर्नल पुरोहित यांनी केलेली याचिका फेटाळून लावली होती.

ani
एएनआय ट्विट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -