घरदेश-विदेशनवे वर्ष आव्हानाचे, बाबा वेंगाची भविष्यवाणी

नवे वर्ष आव्हानाचे, बाबा वेंगाची भविष्यवाणी

Subscribe

२०२१ मध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचण्यात येणार आहे. देशाच्या सीमा भागात त्यांच्या जीव जाण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे.

कोरोना माहामारीमुळे संपूर्ण जग संकटाचे सामना करत आहे. त्यात २०२१ हे वर्ष आव्हानांचे वर्ष असणार आहे असे बाबा वेंगाची भविष्यवाणी सांगत आहे. २०२१ वर्षासाठी बाबा वेंगानी संपूर्ण जगासाठी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा बेल्गारिया येथील भविष्य सांगणारा ज्योतिषी होता. त्याला बाल्कनचा नॉस्ट्रॅडेमस असे म्हटले जायचे. त्याने सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी आजपर्यत खरी ठरली आहे.

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, २०२१मध्ये युरोपवर रासायनिक हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रशियावरही नैसर्गिक आपत्ती येऊन रशियाचा अंत होण्याचा धोका आहे. २०२१ मध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचण्यात येणार आहे. देशाच्या सीमा भागात त्यांच्या जीव जाण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे भयानक आजाराने पीडित होतील. त्याचा आजारमुळे त्यांना बहिरेपण येईल ते ब्रेन ट्रॉमाने पीडित होऊ शकतात, असे बाबा वेंगाची भविष्यवाणी सांगते.

- Advertisement -

बाबा वेंगाने अशी भविष्यवाणी केली आहे की, २०२१मध्ये संपूर्ण जगाला आपत्ती संकटांचा सामना करावा लागणार आहे. संपूर्ण जगासाठी हा सर्वात कठीण वेळ असणार आहे. मानव हा या विनाशकारी संकटांचा साक्षीदार असणार आहे. त्याचबरोबर ब्रम्हांडामध्ये नवीन जीवांचाही शोध लागणार आहे. या शोधामुळे पृथ्वी कशी निर्माण झाली हे समजणार आहे. पुढच्या दोनशे वर्षांत नव्या जगाशी संपर्क साधणार आहेत.

पुढील काळात सुर्यप्रकाशाच्या मदतीने ट्रेन चालवल्या जाणार आहेत. थोड्याच दिवसात पेट्रोलचे प्रोडक्शन बंद होणार असून सोलार एनर्जीच्या वापराची चर्चा वाढणार आहे. या सगळ्यात मोठी भविष्यवाणी ही चीनच्या बाबतीत केली गेली आहे. बाबा वेंगाने असे म्हटले आहे की, चीन हा संपूर्ण जगावर राज्य करणार आहे. विशालकाय ड्रॅगन हा संपूर्ण जगावर राज्य करणार आहे. बाबा वेंगाने असे म्हटले आहे की, येणाऱ्या काळात १०० आणि ५ च्या पुढे अनेक शून्य येण्याची भविष्यवाणी केली आहे. २०२१च्या सुरूवातीला लोकांचा कॅन्सरच्या आजारापासून सुटका मिळणार आहे.

- Advertisement -

कोण आहे बाबा वेंगा?

बाबा वेंगा बेल्गारिया येथील भविष्य सांगणारा ज्योतिषी होता. १९११ मध्ये बाबा वेंगाचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्याची दृष्टी गेली. १९९६ साली बाबा वेंगाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपूर्वी त्याने सोव्हिएत यूनियनचे विघटन, २००१ साली झालेला अटॅक, प्रिंसेस डायनाचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्युनामी अशा अनेक एतिहासिक घटनाबाबात भविष्यवाणी केली होती. आतापर्यंत बाबा वेंगाच्या जवळपास ८५ हून जास्त भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्याच्या भविष्यवाणीमध्ये जग नष्ट होण्याच्या वर्षांचाही उल्लेख करण्यात आला आहे.


हेही वाचा – बंगालच्या विचारसरणीचे लोक पंजाबमध्ये पोहोचले : नरेंद्र मोदी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -