घरदेश-विदेशPetrol Diesel Price : देशात पेट्रोल- डिझेलचे दर 42 दिवसांपासून स्थिर; जाणून...

Petrol Diesel Price : देशात पेट्रोल- डिझेलचे दर 42 दिवसांपासून स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Subscribe

देशात सातत्याने महागाईच दर वाढत आहे. जीवनावश्क वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रोजचे जगणे आता अधिक अवघड होते. यात पेट्रोल- डिझेलच्या किमतींनी देखील उच्चांक गाठला आहे. दरम्यान भारतीय तेल कंपन्या दररोज देशातील पेट्रोल- डिझेलच्या किमती जाहीर करतात. हे नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. मात्र गेल्या 42 दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळतोय. आजही पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान याआधी 6 एप्रिल रोजी पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढल्या होत्या, त्यावेळी पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 80 पैशांनी महागले होते.

आज राजधानी दिल्लीत पेट्रो आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ल्तीत 1 लिटर पेट्रोल 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेल 96.67 रुपये आहे. तर देशाची आर्थिक राजधानीत पेट्रोल 120.51 रुपयांनी विकले जाते. तर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहे.

- Advertisement -

इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची 91.45 रुपये प्रति लिटर किमतीला आहे. यात महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरने विकले जातेय. तर दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा इंधनात दरवाढ केली. मात्र मागील तीन आठवड्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर ‘असे’ तपासा

- Advertisement -

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


Covid Vaccination : परदेश वारी करणाऱ्यांसाठी Booster Dose बाबत BMC ची नियमावली, वाचा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -