घरताज्या घडामोडीOmicron Variant: भारतात झपाट्याने पसरतोय ओमिक्रॉन; ५ राज्यात २१ केसेस, लस घेतलेल्यांना...

Omicron Variant: भारतात झपाट्याने पसरतोय ओमिक्रॉन; ५ राज्यात २१ केसेस, लस घेतलेल्यांना होतेय लागण

Subscribe

जगातील ३८ देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन पसरला आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचा फैलाव झपाट्याने होताना दिसत आहे. चार दिवसांत भारतातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २१वर पोहोचली आहे. याच्यावरून अंदाजात लावला जाऊ शकतो की, ओमिक्रॉनचा प्रसार किती वेगाने होत आहे. २ डिसेंबरला देशात ओमिक्रॉनच्या पहिल्या दोन रुग्णांची नोंद झाली आणि ६ डिसेंबरपर्यंत ओमिक्रॉनबाधित २१ रुग्ण आढळले.

काल, रविवारी एका दिवसात ओमिक्रॉनच्या १७ नव्या रुग्णांची नोंद झाली. राजस्थानमधील जयपूरमध्ये ९, महाराष्ट्रात ७ आणि राजधानी दिल्लीत काल १ रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंट राजधानी दिल्लीसह ५ राज्यांमध्ये पसरला आहे. सर्वात जास्त रुग्ण राजस्थानमध्ये आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. कर्नाटकमध्ये आतापर्यंत २ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत जेवढे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत, ते दक्षिण आफ्रिकेसह इतर हाय रिस्क देशातून प्रवास करून आलेले आहेत. अजूनही बरेच ओमिक्रॉनचे संशयित रुग्ण आहेत, ज्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

किती वेगाने पसरतोय ओमिक्रॉन?

२ डिसेंबर – कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनच्या दोन रुग्णांची नोंद

- Advertisement -

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यादिवशी दोन जण ओमिक्रॉनबाधित आढळले. यामधील एकाचे वय ६६ होते, जो दक्षिण आफ्रिकेतून दुबईहून भारतात आला होता. तर दुसऱ्या रुग्णाचे वय ४६ होते. हा व्यक्ती दक्षिण आफ्रिका किंवा इतर परदेशातून परतला नव्हता. तर एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली होती.

४ डिसेंबर – गुजरात आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनची एंट्री

शनिवारी देशात ओमिक्रॉनच्या दोन नव्या केसेस आढळल्या. एक केस गुजरातमध्ये तर दुसरी केस महाराष्ट्रात आढळली. झिम्बाब्वेहून गुजरातच्या जामनगरहून परतलेल्या ७२ वर्षांचा वृद्ध व्यक्ती ओमिक्रॉनबाधित आढळला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १० हून अधिक जणांचे नमुने घेण्यात आले होते, ज्यांचे अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहेत. याच दिवशी महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये केपडाऊनहून आलेला व्यक्ती ओमिक्रॉनबाधित आढळला होता.

५ डिसेंबर – जयपूर-पुणे आणि दिल्लीत आढळले ओमिक्रॉनचे रुग्ण

देशात काल, रविवारी एका दिवसात १७ नव्या ओमिक्रॉनच्या केसेस आढळल्या. जयपूरमध्ये ९ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले. यामध्ये ४ जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि ५ जण यांच्या संपर्कात आलेले होते. दिल्लीत काल पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली. तसेच महाराष्ट्रात काल पिंपरी चिंचवडमध्ये ६ आणि पुण्यात एक ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली.


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनची मुख्य शहरात एन्ट्री, मात्र घातक नाही – तज्ज्ञ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -