Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश उन्हाळी सुट्टीसाठी रेल्वेकडून 217 विशेष गाड्या, दक्षिण पश्चिम मार्गावर सर्वाधिक सेवा

उन्हाळी सुट्टीसाठी रेल्वेकडून 217 विशेष गाड्या, दक्षिण पश्चिम मार्गावर सर्वाधिक सेवा

Subscribe

नवी दिल्ली : परीक्षांचा मोसम संपताच उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण पर्यटनाला किंवा आपापल्या गावी जाण्यास निघतात. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे लगेचच फुल्ल होतात. गाड्याही भरलेल्या असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे यावर्षी 200 हून अधिक अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे या वर्षी 217 विशेष गाड्यांच्या 4,010 फेऱ्या चालवत आहे. या सर्व विशेष गाड्या 10 एप्रिल 2023 पासून धावत आहेत.

- Advertisement -

रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या जाहीर केली आहे. जास्तीत जास्त दक्षिण पश्चिम रेल्वेमार्गावर 69 विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेनेही 48 जादा गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या चालवण्याबरोबरच इतर उपाययोजनांचीही व्यवस्था रेल्वेने केली आहे. प्रवासाच्या काळामध्‍ये रेल्वेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सर्वत्र कडक नजर ठेवण्‍यात येत आहे. यामध्‍ये आसनांचे कोपरे खराब करणे, विनाकारण साखळी ओढून प्रवासामध्‍ये बाधा आणणे, या गोष्‍टी घडू नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे.

- Advertisement -

भारतीय रेल्वेकडून देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस, गतिमान एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, हमसफर एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेस यासह दररोज 3,000 हून अधिक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवण्यात येतात.

महाराष्ट्रात वंदे भारतला उत्तम प्रतिसाद
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला उत्स्फूर्त मिळाला आहे. 11 मार्चपासून सुरू झालेल्या या दोन्ही एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे अवघ्या काही दिवसांत 8.60 कोटींची महसूल जमा झाला आहे. वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवला होता. मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील नववी वंदे भारत ट्रेन आहे आणि मुंबई-साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील दहावी वंदे भारत ट्रेन आहे.

- Advertisment -