दारू फुकट मिळाली म्हणून इतका प्यायला की जागेवरच…, घटना वाचून धक्का बसेल!

माणूस एकदा का दारूच्या आहारी गेला की ते व्यसन सुटण्यााआधीच तो या जगातून उठतो. असंही म्हटलं जातं. पण अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे.

Addictions-Alcohol

दारुमुळे माणसाच्या आयुष्य कधी कोणत्या वळणावर येईल, हे सांगता येत नाही. दारू शरीरासाठी घातक आहे, हे अनेक माध्यमातून लोकांसमोर येत असतं. पण तरीही काही व्यक्तांनी दारू काही सुटत नाही. माणूस एकदा का दारूच्या आहारी गेला की ते व्यसन सुटण्यााआधीच तो या जगातून उठतो. असंही म्हटलं जातं. पण अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे.

ऊस गोड लागला म्हणून काय तो मूळासकट खायचा नसतो, अशी म्हण आहे. नेमकी अशीच घटना पोलंडमध्ये घडलीय. पोलंडमधील एका नाइट क्लबमध्ये फुकट दारू मिळाली म्हणून तो व्यक्ती इतका दारू प्यायला की थेट त्याच्या जागेवरच जीव गेला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फुकट दारू मिळण्याची इतकी हाव या व्यक्तीला चढली होती की चक्क ९९ मिनीटात तब्बल २२ पेग त्याने प्यायले. साधारणतः दोन पेग घेतल्यानंतर चांगल्यातला चांगला माणूस टल्ली होऊन जातो. मग ९९ मिनीटात २२ पेग पिल्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल याची कल्पना केली तरी धक्का बसतो.

पोलंडमधील एका क्लबमध्ये दारू फुकट मिळतेय म्हणून एका ब्रिटीश तरुणानं ९० मिनिटांत तब्बल २२ पेग प्यायले. इतक्या प्रमाणात दारू पिल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. मार्क सी नावाचा व्यक्ती त्याच्या मित्रांसोबत एका क्लबमध्ये गेला होता. हा ३६ वर्षीय व्यक्ती आधीच दारू प्यायला होता. पण त्यानंतर क्लबमधील एका कर्मचाऱ्याने त्याला दारू फुटक असल्याचं आमिष दिलं आणि मग काय या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने एकापाठोपाठ पेग मारण्यासाठी सुरूवात केली ती थेट त्याच्या मृत्यूनंतरच थांबली.

हे ही वाचा: पोस्टरमध्ये अतिक अहमद आणि अश्रफचा ‘शहीद’ उल्लेख; बीडमध्ये तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्क दारू पिण्यासाठी नकारही देत होता. परंतू तरीही क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वारंवार दारू ऑफर केली. जबरदस्तीनं दारू प्यायला लागल्यानंतर सुमारे दोन डझन हेवी पेग त्याने घेतली. त्यानंतर काही वेळातच तो अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडील सुमारे ४० हजार रुपयांची रोकड लुटली.

मृत्यूच्या वेळी मार्कच्या रक्तात किमान ०.४ टक्के अल्कोहोल आढळून आले. रक्तातील अल्कोहोलची ही पातळी घातक मानली जाते, असं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. या घटनेनंतर पोलंड पोलिसांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध नाईट क्लबमध्ये छापे टाकले असून आतापर्यंत ५८ लोकांना अटक केली आहे. पोलंडच्या तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, क्लबमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मोफत दारूचे आमिष दाखवून भरपूर दारू पाजायची आणि नंतर त्यांचे पैसे चोरायचे अशी रॅकेट इथं चालतात.