घरताज्या घडामोडीindian student died in ukraine: युक्रेनमध्ये आणखीन एका २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा...

indian student died in ukraine: युक्रेनमध्ये आणखीन एका २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Subscribe

युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्यात आणखीन एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. काल, मंगळवारी २१ वर्षीय नवीन शेखरप्पाचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पंजाबमधील राहणार २२ वर्षीय चंदन जिंदल नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. चंदनचा मृत्यू कोणत्याही हल्लामुळे झाला नसून आजारामुळे झाला आहे.

चंदन जिंदल युक्रेनच्या विनित्सिया मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात उपचार घेत होता. इस्केमिक स्ट्रोकच्या आजारामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान काल मृत्यू झालेल्या नवीनच्या मित्राने सांगितले होते की, ‘काही सामान आणण्यासाठी नवीन सुपरमार्केटमध्ये गेला होता. यादरम्यान बॉम्बहल्ला झाला आणि नवीनचा मृत्यू झाला.’ माहितीनुसार, चंदन जिंदल हा विनित्सिया नॅशनल पायरोगोव, मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता. चंदनच्या वडिलांनी केंद्र सरकारला पत्र लिहून मुलाचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारकडून नवीनचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान युक्रेनने आपली हवाई हद्द बंदी केली आहे. अशा परिस्थितीत तिथे कोणत्याही देशाचे विमान लँड होऊ शकत नाही. यामुळे भारत सरकार आता युक्रेनच्या शेजारी असलेल्या देशातून भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशाच प्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह रोमानिया, हंगरी, पोलंड किंवा स्लोवाकिया मार्गे भारतात आणले जातील. आतापर्यंत १० हजारांहून अधिक भारतीय युक्रेनमधून भारतात पोहोचले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Ukraine Russia War: भारतीय नागरिकांनो तात्काळ खारकिव सोडा, भारतीय दूतावासाची दुसरी ॲडव्हायजरी जारी

 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -