घरदेश-विदेश२२१ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची २१ जूनला प्रसिद्धी

२२१ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची २१ जूनला प्रसिद्धी

Subscribe

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या २२१ नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायतींचा समावेश आहे.

राज्यातील २२१ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २७ जून २०२२ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिली. (221 Municipal Councils)

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या २२१ नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायतींचा समावेश आहे. (Nagar Panchayat) भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २१ जून २०२२ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २१ ते २७ जून २०२२ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.

- Advertisement -

त्यानंतर १ जुलै २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार (voter lists) याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ५ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात.

या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.


अदानी इलेक्ट्रिसिटीची वीज चोरांविरोधात कडक पावले, २१ कोटींची वीज चोरी पकडली

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -