घरदेश-विदेशबिहारमध्ये पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळल्याने तब्बल २३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळल्याने तब्बल २३ जणांचा मृत्यू

Subscribe

पाटणा – बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच वीज कोसळण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडल्याने तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे हे २३ मृत्यू एका दिवसांत झाले आहेत. यामध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर ओसरला, पुणे आणि सोलापूरला यलो अलर्ट

- Advertisement -

अररिया आणि पूर्णिया या शहरात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सुपैलमध्ये तीन, सहरसा, बांका आणि जमुई येथे प्रत्येकी दोन लोकांनी आपला जीवगमावला आहे. रोहतास जिल्ह्यातील डेहरी अनुमंडल क्षेत्रात अकोढीगोलाच्या धरहरामध्ये असलेल्या शिव मंदिरावरावरील कळसावर अचानक वीज कोसळली. यामुळे कळसाला भेगा पडल्या नाहीत मात्र, मंदिरातून धूर निघत होता. वीज कोसळल्याने मंदिरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मंदिराच्या चारही बाजूने धूर निघत होता. स्थानिक लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. हे शिव मंदिर अत्यंत पुरातन आहे.

दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच, मुसळधार पावसात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -