घरताज्या घडामोडीजागतिक बँकेतील नोकरीसाठी 23 वर्षीय तरुणाने केले 80 कॉल आणि 600 ईमेल

जागतिक बँकेतील नोकरीसाठी 23 वर्षीय तरुणाने केले 80 कॉल आणि 600 ईमेल

Subscribe

जागतिक बॅकेत नोकरी मिळवण्यासाठी एका तरुणाने तब्बल 80 कॉल आणि 600 इ-मेल केल्याची माहिती समोर येत आहे. वत्सल नाहटा (23) असे या तरुणाचे नाव आहे.

जागतिक बॅकेत नोकरी मिळवण्यासाठी एका तरुणाने तब्बल 80 कॉल आणि 600 इ-मेल केल्याची माहिती समोर येत आहे. वत्सल नाहटा (23) असे या तरुणाचे नाव आहे. वत्सल नाहटा याने नोकरी मिळवण्याचसाठी केलेल्या प्रयत्नांबाबत लिंक्डइनवर पोस्ट शेअर केली आहे.

वत्सल नाहटा यांचे जागतिक बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न होते. जागतिक बॅंकेत नोकरी मिळवण्यासाठी वत्सल नाहटा याने 2020 मध्ये प्रयत्यांना सुरूवात केली. वत्सल नाहटा याने येल विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

- Advertisement -

लिंक्डइनवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये वत्सल नाहटाने लिहिले की, “मी येलमधून 2 महिन्यांत पदवीधर होणार आहे. मात्र अद्याप माझ्याकडे नोकरी नाही. मी नोकरी करू शकत नाही तर, माझा येलमध्ये येण्याचा अर्थ काय? असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. त्यावेळी आई-वडिलांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही कठीण जात होते”, असे त्याने म्हटले.

“पण मी ठरवले होते की भारतात परतणे हा पर्याय नाही. माझा पहिला पगार फक्त डॉलर्समध्ये असेल. मी नेटवर्किंगवर कठोर परिश्रम केले, नोकरीचे अर्ज किंवा जॉब पोर्टल्स पूर्णपणे टाळण्याचा धोका पत्करला. त्यानंतर दोन महिन्यांत 1,500 हून अधिक अर्ज केले. 600 ई-मेल लिहिले आणि 80 कॉल केले. त्यावेळी अनेक नकारांना सामोरे जावे लागले. अखेर माझ्या मेहनतीचे फळ मिळाले आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला 4 नोकऱ्या मिळाल्या. त्यामध्ये मी जागतिक बँकेची निवड केली”, असेही वत्सल नाहटा याने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

याशिवाय, “माझा अनुभव जगाला सांगण्याचा माझा उद्देश हा आहे की, मी लोकांना सांगतो की, कधीही हार मानू नये. कठोर परिश्रम आणि समर्पित वृत्तीने जगातील कोणतीही गोष्ट साध्य करता येते”, असे वत्सल नाहटा याने पोस्टच्या शेवटी म्हटले.

दरम्यान, वत्सल्य नाहचा याच्या पोस्टला 15,000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याची स्टोरीही जवळपास 100 लोकांनी शेअर केली आहे.


हेही वाचा – मोठी बातमी! लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान भारताचे नवे सीडीएस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -