घरताज्या घडामोडीCorona In India: देशात आज २० हजारांनी नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट, पण...

Corona In India: देशात आज २० हजारांनी नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट, पण ८.३१ टक्क्यांनी ओमिक्रॉनबाधितांमध्ये वाढ!

Subscribe

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. काल, सोमवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत १३ हजारांनी घट झाली होती. आज, मंगळवारी सोमवारच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत तब्बल २० हजारांनी घट झाली आहे. ही अतिशय दिलासादायक बाब आहे. मात्र एकाबाजूला दिलासादायक बाब असली तरी दुसऱ्या बाजूला चिंतेची बाब म्हणजे ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आज देशात कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत २० हजार ७१ने घट होऊन २ लाख ३८ हजार १८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८.३१ टक्क्यांनी ओमिक्रॉन रुग्णसंख्येत वाढ होऊन आतापर्यंत ८ हजार ८९१ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३१० जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ५७ हजार ४२१ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. देशातील पॉझिटिव्हीटी रेट १४.४३ टक्के झाला आहे. सध्या देशात १७ लाख ३६ हजार ६२८ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच देशातील रिकव्हरी रेट ९४.९ टक्के झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट १४.९२ टक्के आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत ८० लाख कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात १५८.०४ कोटींहून अधिक लसीचे डोस दिले गेले आहेत.


हेही वाचा – पारशी पद्धतीने कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुप्रीम कोर्टाची बंदी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -