घरट्रेंडिंगबापरे! महिलेच्या पोटातून काढला २४ किलो ट्यूमर, डॉक्टरपण झाले हैराण

बापरे! महिलेच्या पोटातून काढला २४ किलो ट्यूमर, डॉक्टरपण झाले हैराण

Subscribe

मेघालयातील डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश प्राप्त झाले आहे. मेघालयातील पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून चक्क २४ किलो ट्यूमर टाकला. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पश्चिम गारो जिल्ह्यातील जामगे या गावाची राहणारी ३७ वर्षीय महिलेला अचानक पोटदुखीचा त्रास झाला. २९ जुलै रोजी तिला तुरा प्रसृति रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. इसिल्डा संगमा यांनी सांगितले की, ‘३ ऑगस्टला दोन स्त्रीरोग तज्ज्ञांसह डॉक्टर्सच्या एका टीमने या महिलेचे ऑपरेशन केले. हे ऑपरेशन तीन तास सुरू होते. सध्या महिलेची प्रकृती ठिक असून तिला निरीक्षणाखाली ठेवले आहे. ऑपरेशन दरम्यान टाकण्यात आलेला २४ किलो ट्यूमर बायोप्सीसाठी पाठविला गेला आहे, जेणेकरून त्यात कुठलाही कॅन्सर आहे की नाही हे समजू शकेल.’

- Advertisement -

दरम्यान मुख्यमंत्री कनराड सङ्गमा यांनी या यशस्वी ऑपरेशबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटकरून लिहिले आहे की, ‘तुरा जिल्ह्या प्रसूति व बाल रुग्णालयातील (डीएमसीएच)चे डॉक्टर्स पश्चिम गारो हिल्समध्ये राहणाऱ्या महिलेच्या पोटातून २४ किलो ट्यूमर काढला आहे. मी डॉ. व्हिन्स मोमिन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.’


हेही वाचा – कोरोनाबाधित झाले क्वारंटाईन; बंद घरातून लांबवला लाखोंचा ऐवज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -