मणिपूरमधील भूस्खलनात २४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, भुस्खलनामुळे जामा झालेल्या ढिगाऱ्याखाली आतपर्यंत २४ जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे.

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, भुस्खलनामुळे जामा झालेल्या ढिगाऱ्याखाली आतपर्यंत २४ जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफच्या जवानांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नंनी बचावकार्याला सुरूवात झाली. (24 killed in Manipur landslide Fear of further death)

मिळालेल्या माहितीनुसार, या ढिगाऱ्याखालून १८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यात १३ जवान आणि पाच नागरिकांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. जिरीबाम येथे भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिस आणि एनडीआरएफचे पथक कालपासून घटनास्थळी वेगाने काम करत आहेत. पावसामुळे मदतकार्यात अडथळे आले. यावेळी हवाई दलाची देखील मदत घेण्यात आली.

दरम्यान, या भूस्खलनात किती जण बेपत्ता झाले आहेत, याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. जिरीबामला इंफाळशी जोडणाऱ्या एका रेल्वे मार्गाचे काम सुरू असून, त्यासाठी तुपूल यार्ड येथे १०७ जवानांची नियुक्ती करण्यात आली होती.

बुधवारी रात्री तेथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आणि त्यात अनेक जण दबले गेले. यामुळे गुरुवार सकाळपासूनच मदतकार्याला सुरवात झाली. शुक्रवारी ८ जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर आज ६ जणांचे मृतदेह हाती लागले.


हेही वाचा – अमरावतीत उदयपूर घटनेची पुनरावृत्ती? नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ बोलल्याने केमिस्टची हत्या