Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कर्नाटकात २४ रुग्णांचा मृत्यू

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कर्नाटकात २४ रुग्णांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हेतर या रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळे झाले आहेत, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रुग्णालयात ऑक्सिजनचे 60 सिलिंडर दाखल झाले. तसेच या रुग्णालयात म्हैसूरहून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र, म्हैसूरमधील ऑक्सिजनची गरज वाढल्याने हा पुरवठा वेळेवर होत नसल्याचीही माहिती काही वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाहीतर इतर आजारांमुळे झाला आहे. परंतु, वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयातील दृश्यांवरून स्पष्ट होत आहे की, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 24 लोकांचा जीव गेला आहे. संपूर्ण घटनेनंतर 60 ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येडियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच प्लान नाहीय, असे म्हणत काँग्रेसने आरोप केले आहेत.

- Advertisement -