धक्कादायक: तबलीगी जमातच्या कार्यक्रमातील २४ जण कोरोनाबाधित

२५० परदेशी नागरिकांचा समावेश. विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवणार.

Markaz Jamat
तबलीग मरकजच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती, अशा संशया व्यक्त केला जात आहे

दिल्लीतील मरकज येथील इमारतीतून तबलीगी जमातीच्या सुमारे १५०० जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील २०० जणांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील तब्बल १५० जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी २३०० जण सहभागी झाले होते. यातील बहुतांश जण सध्या देशातील विविध राज्यात गेले आहेत. यामधील परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे.

एका बाजूला पंतप्रधानांसह राज्यातील सर्व मुख्यमंत्री देशभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी देशभरात आर्थिक नुकसान सोसूनही २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाही दिल्ली मरकज येथे तबलीगी जमातने परदेशी तसेच देशभरातील बहुतांश राज्यातून २३०० जणांना बोलावून कार्यक्रम ठेवला होता. दिल्ली पोलिसांनी या लोकांना कार्यक्रम थांबवून सगळ्यांना परत पाठवून इमारत खाली करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही या ठिकाणच्या मौलाना यांना समजावले होते. मात्र तरीही या ठिकाणी कालपर्यंत १५०० लोक थांबले होते. यातील २०० जणांना आता कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यातील १५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे देशभर चिंता वाढली आहे.


हेही वाचा – कोरोनावर औषध नाही मग रुग्ण बरे कसे होतात? जाणून घ्या


विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा, बिहार, प. बंगाल, गुजरात, हरियाणा, आसाम या राज्यांमधून अनेकजण आले होते. त्यातील अनेक जण त्यांच्या त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे आता या राज्यांमध्ये या लोकांना शोधण्याचे काम सुरु झाले आहे.
उत्तर मशिदीत धाड टाकल्यानंतर तिथे तबलीघी जमातीचे परदेशी नागरिक आढळून आले आहेत. आता सरकार या सर्व परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवणार आहे. तर बिहार येथील एक मशिदीत मरकजमधील कार्यक्रमातील काही लोक लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकताच त्यांच्यावर मुसलमानांनी दगडफेक केली.

तबलिघी समाजाचा ‘तो’ मौलाना गायब 

दिल्ली पोलिसांनी मौलाना साद, डॉ. जिशान, मुफ्ती शहजाद, एम सैफी, युनूस आणि मोहम्मद सलमान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलीय. मरकज मध्यरात्री ३.३० वाजल्याच्या दरम्यान तब्बल पाच दिवसानंतर रिकामं करण्यात यश मिळालं आहे.या कार्यक्रमाचे आयोजन करणारा मौलाना साद २८ मार्चनंतर बेपत्ता आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस धाडून साद यांचा तपास सुरू केलाय.

आज पंतप्रधान देशभरातील मुख्यमंत्र्यांशी कारणार व्हिडिओ कॉन्फरन्स

देशभरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असतानाच दिल्लीतील मरकज येथून तबलीघी जमातच्या १५०० जणांना बाहेर काढण्यात आले. या ठिकाणाहून २३०० जण बाहेर पडून देशभर गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी एकाच वेळी विडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी देशभरात अशाप्रकारे उपाययोजना सुरु आहेत. तसेच तबलीघी जमातीच्या लोकांना तातडीने शोधून त्यांना विलगीकरण करण्याबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Coronavirus: तामिळनाडूमध्ये बनवला सॅनिटायझर बोगदा


अजित डोवाल यांनी मौलानांची घातलेली समजूत

करोनाचा धोका किती भयंकर आहे हे दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा एजन्सीने समजावून सांगितल्यानंतरही ‘मरकज’साठी जमलेले लोक मशिद रिकामी करण्यास राजी नव्हते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खुद्द राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अर्ध्यारात्री मशिदीच्या मौलानांची समजूत घालण्यासाठी जावे लागले. गृहमंत्री अमित शाह यांनी अजित डोवाल यांना मशिद रिकामी करण्यासाठी उपस्थितांची समजूत घालण्याची विनंती केली होती. गृहमंत्री अमित शहा यांच्या विनंतीनंतर अजित डोवाल दिल्लीच्या निझामुद्दीनजवळ ‘मरकज’ रिकामे करण्यासाठी २८-२९ मार्च रोजी रात्री २.०० वाजता दाखल झाले. डोवाल यांनी मौलाना साद आणि उपस्थितांना समजावून कोविड-१९ चाचणीसाठी तयार केले. सोबतच, या सर्वांना क्वारंटाईनमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही सांगितले.

तबलीघींनी केला तालिबानी क्राईम

संपूर्ण देश सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना तबलीघी जमातने पराकोटीचा निष्काळजीपणा दाखवून या प्रयत्नांना हरताळ फसला आहे. हा त्यांनी तालिबाण्यांप्रमाणे गुन्हा केला आहे.
– मुक्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री

मुसलमान नेत्यांचे समर्थन

आता सोशल मीडियातून मुसलमानांना लक्ष्य करणे सोपे जाणार आहे. प्रथम दर्शनी तबलीघी जमात बेजबाबदार वाटत नाही. भारतात अधिकतर मुसलमानांनी सरकारच्या निर्देशांचे पालन केले आहे.
– ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू काश्मीर

या प्रकरणी मुसलमान समाजाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. सरकारने वेळीच खबरदारी का घेतली नाही?
– असादुद्दीन ओवैसी, अध्यक्ष, मुस्लिम लीग